Jump to content

दशरथ यादव

दशरथ यादव
टोपणनाव: दशरथ यादव उर्फ दादा
जन्म: ८-१० १९७०
माळशिरस, तालुका पुरंदर(पुणे जिल्हा)
चळवळ: परिवतर्तन व साहित्य चळवळ
संघटना: अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड
पत्रकारिता/ लेखन: सकाळ, पुढारी, लोकमत, नवश्कती, सुरा्ज्य व पुणेरी वत्तपत्राचे संपादक
पुरस्कार: युवा पत्रकार, कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार आदी २० गौरव
धर्म: शिवधर्म
प्रभाव: छत्रपती शिवाजीमहाराज, शरद पवार, पुरुषोत्तम खेडेकर, फुले, शाहू, आंबेडकर
वडील: राजाराम
आई: शातांबाई
पत्नी: वर्षा
अपत्ये: तीन
तळटिपा: मराठी साहित्य व प्रबोधन चळवळीत प्रभावी काम असून विपुल साहित्य लेखन केले आहे

दशरथ राजाराम यादव (जन्म: ८ ऑक्टोबर १९७०) हे एक मूळचे पत्रकार असलेले मराठी साहित्यिक आहेत. पुरंदर तालुक्यातील माळशिरस (भुलेश्वर) हे त्यांचे मूळ गाव. तेथील कऱ्हा नदीच्या काठावरच त्यांच्या साहित्याचा वटवृक्ष बहरला. पत्रकार, कवी, लेखक, कांदबरीकार, गीतकार, इतिहास संशोधक, नाटककार, वक्ता, गीतकार असे अष्टपैलू साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे. पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल विभागात ते व्याख्याता आहेत. ते सध्या पुणे हडपसर येथे राहत आहेत.

पुरोगामी विचाराचा वारसा आणि वसा समाजामध्ये रुजविण्यासाठी त्यांनी शेकडो व्याख्याने दिली आहेत. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यांतील लेखक, कवींना साहित्यचळवळींतून त्यांनी प्रोत्साहन दिले आहे.

श्री. यादव हे गाजलेल्या 'वारीच्या वाटेवर' या महाकांदबरीचे लेखक आहेत.

पत्रकारितेतील काम

दैनिक सकाळमध्ये उपसंपादकाचे काम केले. शिवाय केसरी, लोकमत, पुढारी, नवशक्ती आदी दैनिकांतही वेळोवेळी काम केले. वृत्तपत्रांत पंढरपूरच्या वारीच्या वार्तांकनाची सुरुवात केली. वृत्तपत्रांतून शेकडो लेख लिहिले. पुणे विद्यापीठात बहिःशाल विभागात व्याख्याता म्हणून काम केले, पुण्याच्या यूथ प्रेस क्लबचे अध्यक्ष म्हणून काम केले.

दशरथ यादव यांनी लिहिलेली पुस्तके

  • उन्हातला पाऊस
  • गाणी शरद पवारांची
  • गुंठामंत्री
  • गुंठामंत्री या चित्रपटावे पटकथालेखन
  • घुंगुरकथा
  • ढोलकीच्या तालावर या चित्रपटाचे गीतलेखन
  • दिंडी निघाली पंढरीला या चित्रपटाचे पतकथालेखन
  • सत्यशोधक दिनकरराव जवळकर
  • पोवाडा पुरुषोत्तमाचा
  • फाटक या मराठी चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद आणि गाणी
  • बालाघाटचा सिंह
  • महिमा भुलेश्वराचा (गीत अल्बम)
  • मातकट (कादंबरी)
  • यादवकालीन भुलेश्वर (संशोधनात्मक पुस्तक)
  • रणांगण सिनेमाचे संवाद व पटकथा
  • बाराशे कवनाचे वारीचे खंडकाव्य
  • वारीच्या वाटेवर (महाकादंबरी)
  • लेखणीची फुले (कवितासंग्रह)
  • शिवधर्मगाथा (पाच हजार अंभग)
  • सत्याची वारी (व्हीडिओपटाचे लेखन)
  • साहित्यभूषण छत्रपती संभाजी महाराज
  • सुतसंस्कृती

चित्रपटासाठी लेखन

  • गुंठामंत्री -कथा
  • ढोलकीच्या तालावर -गीते
  • दिंडी निघाली पंढरीला- ‍‍‍कथा
  • भक्तिसागर या माहितीपटाचे लेखन
  • महिमा भुलेश्वराचा -गीताचा अल्बम
  • रणांगण - पटकथा संवाद
  • सत्याची वारी -माहितीपटाचे लेखन

प्रमुख संस्थाचे पदाधिकारी

  • अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त म्हणून काम करीत आहेत.
  • छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाची सुरुवात करून ते राज्यस्तरीय संमेलन दरवर्षी घेतले जाते.
  • दशरथ यादव हे खानवडी (ता. पुरंदर) येथे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक आहेत.
  • सासवडच्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे ते सुरुवातीपासून संयोजक आहेत.
  • गाजलेल्या कवी मुलांच्या भेटीच्या उपक्रमाचे प्रमुख असून, लावणी व कवितेची जुगलबंदी हा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी सुरू केला. राज्यस्तरीय लावणी महोत्सवात त्यांच्या लावण्यांना चागला प्रतिसाद मिळाला आहे.
  • सासवड येथे भरलेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सुकाणू समितीचे सदस्य व राज्य प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष.
  • अध्यक्ष - यूथ प्रेस क्लब पुणे.

दशरथ यादव यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

  • खानवडी (ता.पुरंदर) येथे २०१७ साली झालेल्या १०व्या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
  • खैराव (माढा तालुका) येथे झालेल्या सोळाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. (हे संमेलनाध्यक्षपद यापूर्वी इंद्रजित भालेराव, उद्धव कानडे, डाँ. कृष्णा इंगवले, प्रकाश गव्हाणे, प्रशांत जोशी, मुकुंदराज कुलकर्णी, राजेंद्र दास, लक्ष्मीनारायण बोल्ली, शरद गोरे, श्रीकांत मोरे, शिवाजी चाळके, सुरेश पाठक व सुवर्णा गुंड यांनी भूषविले आहे).
  • ठाणे येथील डाँ. बाबासाहेब आंबेडकर मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.
  • बारामती येथे झालेल्या पहिल्या लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • बेळगाव येथे झालेल्या कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.
  • सासवड येथे २०१४ साली झालेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते प्रवक्ते होते. त्यावेळी सुकाणू समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पहिले.
  • श्री. यादव यांना छत्रपती संभाजीराजे साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
  • दलितमित्र, महाराष्ट्र राज्यस्तरीय युवा पत्रकार रत्न, महाराष्ट्र साहित्यरत्न कला गौरव पुरस्कार, डाँ बाबासाहेब आंबेडकर साहित्य भूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कारही यादव यांना मिळाले आहेत.
  • जीवन संघर्ष पुरस्कार
  • दलित मित्र पुरस्कार
  • नारायण सुर्वे काव्य पुरस्कार
  • पुरंदर साहित्यरत्न पुरस्कार
  • युवा पत्रकार पुरस्कार २००० साली कांशीराम यांच्या हस्ते प्रदान