Jump to content

दशरथ देव

दशरथ देव (२ फेब्रुवारी १९१६- १४ ऑक्टोबर १९९८) हे भारतीय राजकारणी होते. ते १० एप्रिल १९९३ ते ११ मार्च १९९८ या काळात त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री होते. ते १९५२, १९५७ आणि १९६२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून तर १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून त्रिपुरा राज्यातील त्रिपुरा पूर्व लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.