दशमी
दशमी (मराठी खाद्यपदार्थ) याच्याशी गल्लत करू नका.
दशमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. दर महिन्यात साधारणत: शुद्ध आणि वद्य अश्या दोन दशम्या येतात. दशमीलाच द्वादशी म्हणतात.
काही महत्त्वाच्या दशम्या
- ज्येष्ठ शुद्ध दशमी म्हणजे गंगा दशहरा संपायचा दिवस. प्रतिपदेला सुरू झालेला साधारणपणे दहा दिवसांचा दशहरा दशमीला संपतो. याच ज्येष्ठ शुद्ध दशमीला हनुमानाचे सुवर्चलाशी लग्न झाले.
- आश्विन शुद्ध दशमी - विजया दशमी, दसरा.
- आश्विन वद्य दशमी - गोवत्स द्वादशी, वसु बारस (दिवाळीची सुरुवात)
- पौष कृष्ण दशमी - पार्श्वनाथ जयंती (जैन), दयानंद सरस्वती जयंती