Jump to content

दशमान पद्धत


दशमान पद्धत संक्षिप्त सूची
संख्यामराठीसंस्कृत
एकएकं
१०दहादशम्‌
१००शंभरशतं
१,०००हजारसहस्रम्‌
१०,०००दहा हजारअयुतम्‌
१,००,०००लाखलक्षम्‌
१०,००,०००दहा लाखप्रयुतम्‌
१,००,००,०००कोटीकोटिः
१०दहा कोटीअर्बुदः
१०अब्जअब्जम्‌
१०१०खर्वखर्वः
१०११निखर्वनिखर्वम्‌
१०१२महपद्‌ममहापद्मः
१०१३शंकुशंकुः
१०१४जलधीजलधिः
१०१५अन्त्यअन्त्यम्‌
१०१६मध्यमध्यम्‌
१०१७परार्धपरार्धम्‌

अतिप्राचीन भारतामधे गणित शास्त्रावर बरेच संशोधन झाले आहे. त्यावेळापासून भारतीयांनी गणितासाठी वापरलेल्या चिन्हांना अंक असे म्हणले जाते. हेच अंक (१, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, ०) सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक आहेत. यातील दहाव्या चिन्हाच्या(अंक-०) शोधामुळे आपल्या दशमान पद्धतीला सुरुवात झाली.

या दहाव्या अंकास संस्कृत भाषेत शून्य हे नाव आहे. "ख", "गगन", "आकाश", "नभ", "अनंत", "रिक्त", "पुज्य" अशी अनेक नावे त्यावेळी वापरली जात असत. आता ही शिक्षक अंक शिकवताना 'एकावर पुज्य दहा, दोनवर पुज्य वीस' अशी उजळणी घेतात. या (शून्य) अंकाची गरज असल्याचे प्रथम भारतीय गणितज्ञांना जाणवले.

आसा ह्या वैदिक काळाच्या आरंभी होऊन गेलेल्या वायव्य भारतात राहाणाऱ्या भारतीय गणितज्ञांनी जगात सर्वप्रथम दशमान पद्धतीची संकल्पना मांडली. अंकांच्या स्थानानुसार त्याची किंमत बदलेल या आसा यांनी मांडलेल्या संकल्पनेतून जगाला अंकलेखनाच्या दशमान पद्धतीची देणगी मिळाली. अशा रितीने लिहिलेले आकडे हिंदासा (हिंद देशातील आसा) या नावाने ओळखले जाऊ लागले. आसांच्या या शोधामुळे गणिताची प्रगती वेगाने होण्याला हातभार लागला.

ऋग्वेदात दशमान पद्धतीचा वापर अनेक ऋचांमध्ये आहे. त्यामुळे ऋग्वेद काळा आधीपासून ही पद्धती रूढ होती हे दिसते.

संदर्भ

शोधांच्या जन्मकथा - भाग १, लेखिका- नंदिनी थत्ते, ग्रंथघर प्रकाशन, आवृत्ती - १९८९, पान ४ - ७, पान ५३.


हे सुद्धा पहा

द्विमान पद्धत

पंचमान पद्धत

द्वादशमान पद्धत

षोडषमान पद्धत

रोमन पद्धत