दर बळीमागे दिलेल्या धावा
दर बळीमागे दिलेल्या धावा हे क्रिकेटच्या खेळातील गोलंदाजाच्या (बॉलर) प्रभावीपणाचे मानक आहे.
एखाद्या बॉलरसाठी हा आकडा काढण्यासाठी खालील समीकरण वापरले जाते.
- avg = दर बळीमागे दिलेल्या सरासी धावा
- wickets = विवक्षित कालखंडातील एकूण बळी
- runs = कथित कालखंडात बॉलरच्या बॉलिंग दरम्यान काढलेल्या धावा
- यात नो बॉल व वाइड बॉल सोडून इतर अवांतर धावा मोजत नाहीत.
उदा. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राने आत्तापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये ११,६८४ धावा देऊन ५४२ बळी मिळवले आहेत.
म्हणजेच -
मॅकग्राच्या सरासरी दर बळीमागे दिलेल्या धावा आहेत २१.५५.