Jump to content

दयानिधी मारन

दयानिधी मारन (डिसेंबर ५, इ.स. १९६६ - ) या द्रमुक पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडू राज्यातील मध्य चेन्नई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते मनमोहन सिंह यांच्या मंत्रीमंडळात इ.स. २००४ ते इ.स. २००७ दरम्यान माहिती तंत्रज्ञान मंत्री होते. तर इ.स. २००९ पासून वस्त्रोद्योगमंत्री आहेत.

ज्येष्ठ द्रमुक नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरासोली मारन हे त्यांचे वडील होते.