दनु
हिंदू पौराणिक साहित्यानुसार दनु (मराठी लेखनभेद: दनू ; संस्कृत: दनु) ही कश्यपाची पत्नी व दानव वंशाची माता होती. ही दक्ष प्राचेतस प्रजापती व त्याची पत्नी असिक्री यांची कन्या होती[१].
वंश
कश्यपापासून हिला झालेले पुत्र दानव या मातृक नावाने संबोधले जातात. शतपथ ब्राह्मणानुसार वृत्र हा दनूचा पुत्र होता. महाभारतमते हिला विप्रचित्ति आदी ३४ पुत्र होते[१]. पौराणिक साहित्यात अन्यत्र हिला १२६ पुत्र होते, असे उल्लेख आढळतात[१]. तिच्या पुत्रांपैकी केशिन्, तारक, नमुचि, नरक, बाण, विप्रचित्ति, वृषपर्वन्, शंबर, हिरण्यकश्यपू हे पुत्र विशेष ख्यात झाले.
मंदिरे
दनूस पूज्य देवी मानून बांधलेली दोन मंदिरे इंडोनेशियात बाली बेटावर आहेत :एक ब्रातान तळ्याजवळ असलेले पुरा उलुन दनु मंदिर व दुसरे पनेलोकान या स्थानानजीकचे उलुन दनु बातुर मंदिर.