Jump to content

दत्तात्रेय गणेश सारोळकर

दत्तात्रेय गणेश सारोळकर
राष्ट्रीयत्व भारतीय

दत्तात्रेय गणेश सारोळकर ( :इ.स.१८९४; - १९३४) हे एक मराठी कादंबरीकार, कथाकार, नाटककार आणि राजकीय व सामाजिक स्वरूपाचे वैचारिक लेखन करणारे लेखक होते. ते मौज वर्तमानपत्राचे काही काळ संपादकही होते. त्यांनी ऐतिहासिक, पौराणिक, व सामाजिक अशी एकूण बारा नाटके लिहिली. त्यांची नाटके मनोहर स्त्रीसंगीत मंडळी आणि नाट्यकलाप्रसारक मंडळी या नाट्यसंस्थांनी रंगभूमीवर आणली होती. नाटकांखेरीज, दत्तात्रेय सारोळकरांनी काही अन्य पुस्तकेही लिहिली आहेत.

ग्रंथाचे नाव प्रकार प्रसिद्धी वर्ष
आमचा समाज व समाजशास्त्रवैचारिक ग्रंथ
एकादशीलघुकथासंग्रह
जनता-जनार्दनसामाजिक कल्पनारम्य नाटक१९२२
दर्यादौलतऐतिहासिक नाटक१९२९
दर्यासारंगऐतिहासिक नाटक१९२९
देहान्त प्रायश्चित्तसामाजिक कल्पनारम्य नाटक१९२८
पदवीधरसामाजिक व कल्पनारम्य नाटक१९३२
पराक्रमाचा पायाऐतिहासिक नाटक१९२९
पेशव्यांचा पेशवाऐतिहासिक संगीत नाटक१९२५
भारतमातेची श्रेष्ठता अर्थात मिस मेयोच्या असत्य विधानांचे खंडनवैचारिक१९२८
मराठीची पाईकीसंकीर्ण
रंगेल राजकुमारकादंबरी१९२८
राजांचा राजापौराणिक नाटक१९३०
वीर सौभद्रगद्यपद्यात्मक पौराणिक नाटक१९२९
शुभमंगलसामाजिक नाटक१९२९
श्रीमंताची पोरकादंबरी
सतीचा हंबरडाकादंबरी१९२९
सम्राटाचा सूडसामाजिक कल्पनारम्य नाटक१९३०
सुधारलेले विवाहशास्त्रवैचारिक ग्रंथ
स्वातंत्र्याच्या कहाण्याराजकीय