Jump to content

दत्ता देसाई

दत्ता देसाई (१४ एप्रिल, इ.स. १९५६ - ) हे पाणी, शिक्षण, जनविज्ञान, आदिवासी, स्त्री सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत काम करणारे करणारे एक मराठी सामाजिक कार्यकर्ते आहेत.

देसाई यांनी वाणिज्य शाखेतील पदवी घेतल्यानंतर सुरुवातीला काही काळ टेलिफोन खात्यात नोकरी केली. नंतर महाराष्ट्र व आंध्र बॅॅंकेत त्यांची निवड झाली. तेथे उपशाखाव्यवस्थापक पदापर्यंत ते पोहोचले. पण समाजकार्याची आवड असल्याने १९८३ मध्ये बॅॅंकेची नोकरी सोडून देऊन त्यांनी पुणे येथील समाज विज्ञान अकादमीत दीर्घकाळ पूर्ण वेळ सचिव म्हणून काम केले. या संस्थेच्या माध्यमातून दत्ता देसाई यांनी महाराष्ट्र राज्यातील २५ जिल्ह्यांंमध्ये विद्यार्थी-युवक, कामगार-कर्मचारी, शेतकरी, महिला तसेच सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी अभ्यास व प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली.

अन्य कामे

  • भारत ज्ञानविज्ञान समिती व भारतीय जनविज्ञान आंदोलन या माध्यमांतून साक्षरता, जनवाचन आंदोलन, समता विज्ञान आंदोलन व शिक्षण हक्क चळवळ.
  • आरोग्य साक्षरता, पर्यावरण या क्षेत्रांत सामाजिक कार्य
  • जल व सिंचन धोरणे व हक्कविषयक समिती, महाराष्ट्र शिक्षण हक्क समिती, अन्न हक्क समिती वगैरेंवर काम
  • लोक वैज्ञानिक दुष्काळ निर्मूलन व्यासपीठाचे ते सह-समन्वयक होते तर सर्वांसाठी आरोग्य या आंतररराष्ट्रीय अभियानाच्या अंतर्गत जन आरोग्य अभियानाचे ते राज्य समन्वयक होते.
  • विविध क्षेत्रांत काम करताना त्यांचे लिखाणही सुरू असते. देसाई यांनी काही ग्रंथांचे सहलेखन तर काहींचे संपादनही केले.

पुस्तके

  • आधुनिकतेचे आगमन : युरोपकेंद्री इतिहासाचा जागतिक विचार
  • जलयुद्ध की क्रांती?
  • महाराष्ट्रातील दुष्काळ
  • महाराष्ट्रातील विकासाची दिशा : हवी नवी मळवाट
  • शहीद भगतसिंगांवरील अनुवादित पुस्तक

पुस्तिका

  • गोवंश हत्याबंदी
  • पेटंट मक्तेदारी
  • पाणी, दुष्काळ आणि विकास
  • बुवाबाजीवर प्रकाशझोत
  • भारतीय शेती आणि डंकेल नीती

पुरस्कार

  • डॉ. राम आपटे प्रबोधन पुरस्कार (२००३)
  • कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार देसाई (२०१६)