Jump to content

दत्तप्रसन्न कारखानीस


दत्तप्रसन्न नारायण कारखानीस (जन्म : १७ ऑगस्ट १९०८ - - १५ फेब्रुवारी १९८६ ) मराठी कवी होते.त्यांचा जन्म खानदेशातील चाळीसगाव येथे झाला . 'कुणा आवडतो मोर पिसाऱ्याचा' ही त्यांनी लिहिलेली कविता शाळेच्या क्रमिक पाठ्यपुस्तकात होतो, ती मुलांच्या अतिशय आवडीची होती. या कवितेशिवाय त्यांच्या इतरही काही कविता पाठ्यपुस्तकांत होत्या.

त्यांच्या कवितांचे 'क्षितिजावर' व काव्यविलास असे दोन कवितासंग्रह निघाले.

कुणा आवडतो......पहिले कडवे

कुणा आवडतो मोर पिसाऱ्याचा
असे कोणाला छंद कोकिळेचा;
कुणी असतो नादिष्ट पोपटाचा
मला आहे परि नाद कोंबड्याचा ! II १ II