दक्षिण शिलींध्री
दक्षिण शिलींध्री किंवा खाटिक (इंग्लिश:Peninsular Chestnutbellied Nuthatch; हिंदी:सिरी) हा एक आकाराने चिमणीपेक्षा लहान पक्षी आहे.
नराचा वरील भागाचा रंग तांबूस, गळ व कंठ पांढुरका असतो. तसेच मादीच्या खालील भागाचा वर्ण तांबूस असतो.
वितरण
ते निवासी असतात. फिरोजपुर, नाशिक या पूर्व सीमारेषा असलेला उत्तर व मध्य भारत, पूर्वेकडे तराई, गंगेचे खोरे ते बिहार, राजस्थान, ओरिसा, आंध्र प्रदेश या ठिकाणी आढळतात.
निवासस्थाने
ते विरळ जंगले आणि वनराया या ठिकाणी राहतात.
संदर्भ
- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली