Jump to content

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा ही कोल्हापूर येथे असलेली साहित्य संस्था आहे. ही संस्था २५ मे १९८२ रोजी स्थापन झाली. संस्थेचे कार्यक्षेत्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचे दक्षिणेकडचे सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर हे चार जिल्हे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा महाराष्ट्र सरकारच्या साहित्य संस्कृती मंडळाकडून दरवर्षी ५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त करीत असली तरी, ही संस्था या चार जिल्ह्यांतील एखाद्या गावी, किंवा कार्यक्षेत्राच्या किंचित बाहेर असलेल्या रत्‍नागिरी जिल्हा) व बेळगाव-निपाणी येथेही साहित्य संमेलने भरवते. संस्थेची आतापर्यंत कोल्हापूर, बेळगाव, सांगली, निपाणी, कुंभारगाव (सातारा जिल्हा]]), येडेनिपाणी (सांगली जिल्हा), नागठाणे (सांगली जिल्हा), रेणावी (सांगली जिल्हा), चिखली (रत्‍नागिरी जिल्हा?), माचीगड (बेळगाव जिल्हा) अशा विविध ठिकाणी साहित्य संमेलने झाली आहेत. ना.सं. इनामदार, बाबा कदम, गौतमीपुत्र कांबळे, प्रमोद कोपर्डे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ग.ल. ठोकळ, अनंत तिबिले, रणजित देसाई, प्रा. चंद्रकुमार नलगे, अशोक नायगावकर, प्रा. एन.डी. पाटील, रंगराव बापू पाटील, वसंत केशव पाटील, डॉ. गंगाधर पानतावणे, वसंत बापट, डॉ. द.ता. भोसले, लक्ष्मण माने, ज्ञानेश्वर मुळे, आनंद यादव, प्रा. फ.मुं. शिंदे, शिवाजी सावंत, आ.ह. साळुंखे, प्राचार्य म. द. हातकणंगलेकर, वामन होवाळ, आदींनी आतापर्यंत संमेलनाध्यक्षपद भूषवले आहे.

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि मिरज पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मिरजेत २५ डिसेंबर २०१३ रोजी.एक विद्यार्थी साहित्य संमेलन झाले. हे या संस्थांनी भरविलेले या प्रकारचे पहिलेच साहित्य संमेलन होते. संमेलनाध्यक्षपदी पेठ शिवापूर येथील पेडणेकर हायस्कूलची नववीतील विद्यार्थिनी, बालकवयित्री रमीजा जमादार ही होती.

'सांगली जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था' व कोल्हापूरची 'दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन तीन जानेवारी २०१९ रोजी कर्नाळच्या कर्नाळ हायस्कूलमध्ये झाले. हे साहित्य संमेलन म्हणजे 'सबकुछ विद्यार्थी' असे होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी तानंग गावची कु. तेजश्री जोतीराम पाटील इयत्ता नववी ही होती. सांगली जिल्ह्याला विद्यार्थी साहित्य संमेलनाची परंपरा असून यापूर्वी मिरज, बेडग व सांगलीमध्ये ही संमेलन झाली. हीही संमेलने 'सब कुछ विद्यार्थी. अशीच झाली आहेत.


  • दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे १ले साहित्य संमेलन कोल्हापूर येथे २५ मे १९८२ या दिवशी झाले. उद्‌घाटक यशवंतराव चहाण तर अध्यक्ष ग.ल.ठोकळ होते.
  • दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे ४थे साहित्य संमेलन {{बेळगाव]] येथे १९८६ साली झाले. आनंद यादव संमेलनाध्यक्ष होते.
  • दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २३वे साहित्य संमेलन कऱ्हाड येथे २० जानेवारी २०१३ या दिवशी झाले. ’उपरा’कार लक्ष्मण माने संमेलनाध्यक्ष होते.
  • दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २५वे साहित्य संमेलन कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथे १७-१८ जानेवारी २०१४ या दिवशी झाले. डॉ. आ.ह. साळुंखे संमेलनाध्यक्ष होते.
  • दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २७ वे साहित्य संमेलन ९ आणि १० जानेवारी २०१६ रोजी कोल्हापुरात झाले. ख्यातनाम साहित्यिक आणि भारताचे अमेरिकेतील कौन्सुल जनरल ज्ञानेश्वर मुळे संमेलनाध्यक्षपदी होते.

पहा : साहित्य संमेलने