दक्षिण एक्सप्रेस
१२७२१/१२७२२ दक्षिण एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक वेगवान प्रवासी सेवा आहे. दक्षिण मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी तेलंगणाची राजधानी हैद्राबादला दिल्लीसोबत जोडते. हद्राबादच्या हैदराबाद रेल्वे स्थानक व दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावणारी ही गाडी १६७ किमी अंतर सुमारे ३ तासांत पूर्ण करते.
बोगी
दक्षिण एक्सप्रेस रेल्वे गाडीला 2 वातानुकूलित टू टायर , 2 वातानुकूलित थ्री टायर, 14, श्ययन वर्ग, 4 सामान्य बिनाआरक्षित, आणि एक खानपान व्यवस्था बोगी अश्या एकूण 23 बोगी आहेत. विशेषता भारतीय रेल्वे प्रवाश्यांच्या मागणी नुसार अनेक वेळा स्वतहाच्या अधिकारात बोगीतिल व्यवस्थेत अनुकूल बदल करते. त्याचा परिणाम म्हणून दक्षिण एक्सप्रेसशी जवळीक साधण्यासाठी विशाखापट्टणम लिंक एक्सप्रेस ही ट्रेन, क्रं. 12861 / 62 चालू झाली.
सेवा
दक्षिण एक्सप्रेस 1670 किमी अप प्रवास 29 तास 30 मिनिटात पार करते आणि परतीचा 1669 किमी प्रवास 30 तासात पार करते. या रेल्वेचा भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार सरासरी वेग तासी 55 किमी पेक्षा जादा आहे. त्यामुळे प्रवाशी सुपरफास्ट भाड्यावर अधिभार आहे. काजीपेट जंक्शनवर गाडी क्रं. 12861 / 62 विशाखापट्टणम लिंक एक्सप्रेस आणि गाडी क्रं. 12721 / 22 दक्षिण एक्सप्रेस या रेल्वेच्या बोगी जोडल्या जातात तसेच वेगळ्या केल्या जातात. WAP 7 रेल्वे इंजिनचे सहाय्याने ही रेल्वे नियमित धावते.
वेळापत्रक
प्रस्थान | वेळ | आगमन | वेळ |
---|---|---|---|
ट्रेन क्रं.12721 हैद्राबाद डेक्कन | 22.30 hrs दर दिवशी (IST) | हजरत निजामूद्दीन | 4.00 hrs (IST) तिसरे दिवशी[१] |
ट्रेन क्रं.12722 हजरत निजामूद्दीन | 23.00 hrs दर दिवशी (IST) | हैद्राबाद डेक्कन | 5.00 hrs (IST) तिसरे दिवशी [२] |
[३]सिकंदराबाद, चंद्रपूर. नागपुर, इटारशी, होसंगाबाद, हबिबगंज, भोपाळ, झांशी, ग्वालियर, आग्रा कोंटैंमेंट, मथुरा, फरीदाबाद [४] या कांही महत्त्वाच्या स्थानकातून ही रेल्वे प्रवास करते.
संदर्भ
- ^ "मुंबई फायटिंग नॅरोझ टू वन होटेल" (इंग्लिश भाषेत). २७ ऑगस्ट २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "दक्षिण एक्सप्रेस (१२७२२)" (इंग्लिश भाषेत). २७ ऑगस्ट २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "दक्षिण एक्सप्रेस वेळापत्रक" (इंग्लिश भाषेत). 2015-09-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ ऑगस्ट २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "निजामुद्दीन एक्सप्रेस (१२७२१) रेल्वेची चालू स्थिती" (इंग्लिश भाषेत). २७ ऑगस्ट २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)