Jump to content

दक्षिण आशियाई अश्मयुग

दक्षिण आशियाई अश्मयुग दक्षिण आशिया मधील पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवअश्मयुग कालावधी व्यापते. दक्षिण आशियातील सर्वात प्राचीन शरीररचनेने आधुनिक मनुष्य असल्याचे पुरावे भारताच्या कडप्पा गुहेत, आणि श्रीलंकेत बटाडोंबाळेना आणि बेलीलेनाच्या गुहेत सापडले आहेत.[] मेहरगडमध्ये, जे आजच्या पश्चिम पाकिस्तानमध्ये आहे, नवअश्मयुगावाची सुरुवात इ.स.पू. ७००० मध्ये झाली आणि इ.स.पू. ३३०० पर्यंत आणि कांस्य युगाच्या पहिल्या सुरुवाती पर्यंत चालले. दक्षिण भारतात, मध्याश्मयुग इ.स.पू. ३००० पर्यंत आणि नवअश्मयुग इ.स.पू. १४०० पर्यंत टिकून राहिले आणि त्यानंतर महापाषाण संक्रमणकालीन काळात कांस्य युगाला वागळल्या गेले. उत्तर आणि दक्षिण भारतात साधारणतः इ.स.पू. १२०० ते १००० सुमारे लोह युग सुरू झाला.( पेंट केलेले ग्रे वेर कल्चर, हालूर, पायमपल्ली ).

मध्य कृष्णापूर्व ऐतिहासिक स्थळे- दक्षिण भारतातील तुंगभद्रा नदीचे खोरे बहुदा दरीवर सापडलेल्या पुरावे नुसार कार्यक्षम पेलेओलिथिक सांस्कृतिक क्षेत्र आहे.
सोनभद्रातील पंचमुखी टेकडीवरील बेलन व्हॅली केव्ह पेंटिंग्ज

होमो इरेक्टस

प्लाइस्टोसीन कालखंडा दरम्यान होमो इरेक्टस पाकिस्तानच्या ऊर्ध्व पंजाब मध्ये पोठोहार पठारात सोन नदीच्या बाजूने (आधुनिक रावळपिंडी जवळ) राहत असत. आता भारत, पाकिस्तान आणि नेपाळ या देशांमध्ये शिवलिक प्रदेशात सोयनियन साइट्स आढळतात. द्विमुखी हातकुऱ्हाड आणि अश्मपरशु परंपरा मध्य प्लाइस्टोसीन काळात उद्भुत झाल्या असाव्या. [] निम्न प्लाइस्टोसीन काळाचे अशूलियन आणि चिरण्यासाठीच्या साधनांच्या वापराची सुरुवात जवळजवळ मध्यम प्लाइस्टोसीन मध्ये देखील असू शकते. []

भारतीय उपखंडातील नवाश्म युगातील अवशेषांचा शोध (७००० ई.स.पू. - ५५०० ई.स.पू.) हरियाणाच्या पिंजोर येथून एचएमटी कॉम्प्लेक्समधून वाहणाऱ्या ( सरस्वती नदीचे पुराजलमार्ग) नदीच्या काठावर [][] ब्रिटिश भूगर्भशास्त्रज्ञ आणि जीवाश्मशास्त्रज्ञ गाय एलकॉक पिलग्रिम यांनी लावला होता. यांनी १५ लाख वर्षे शोधला आर्ष मानवी दात आणि की एक जबडा भाग प्राचीन लोक, ज्याने हे आदी मानव बुद्धिमान होमिनिनि असल्याचे निर्देशित झाले आणि ते अशूलियनअशूलियन काळाच्या १५,००,०००वर्षांपूर्वी [] (आताच्या चंदीगड जवळील) पिंजोर प्रदेशात राहत असल्याचे आढळले.[] हरियाणामधील पिंजोर ते नालागड (हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्हा) पर्यंत या भागात निम्न पुराणाश्मयुग कालावधीची क्वार्टझाइट साधनांचा शोध लागला आहे.[]

होमो सेपियन्सचे आगमन

तंतुणिका डीएनएचे विश्लेषण केल्यावर कळले आहे कि होमो सेपियन्सचे दक्षिण आशियात स्थलांतरण ७५,००० ते ५०,००० वर्षांपूर्वीचे आहे.[] [] Y गुणसूत्र हॅलोग्रुपच्या एका विश्लेषणात मदुराईच्या पशचिमेकडील गावातला एक माणूस या स्थलांतरित मनुष्यांचा थेट वंशज आहे असे आढळले आहे.[१०]  श्रीलंकेतील लेण्यांमध्ये दक्षिण आशियातील आधुनिक होमो सेपियन्सची सर्वात आधीची नॉन-माइटोकॉन्ड्रियल (तंतुणिक) अभिलेख सापडले आहे. हे ३४,००० वर्षांपेक्षा जुने आहेत. (केनेडी २०००: १८०) भारतातील दक्षिण उत्तर प्रदेश मधील बेलन मध्ये अवशेषांचे वय रेडिओकार्बनी वयमापनात १८,०००-१७,००० वर्षे असल्यायचे स्पष्ट झाले आहे.

भीमबेटका रॉक पेंटिंग, मध्य प्रदेश, भारत .

भीमबेटकाच्या दगडी आश्रयस्थानांमध्ये मानव ऊर्ध्व पुराणाश्मयुगा पर्यंत (१० वे ते ८ वे सहस्त्रक इ.स.पू.) वास्तव्य करीत होते आणि येथील भित्तिचित्र इ.स.पू. ३०,००० मधील आहेत [११][१२] आणि जवळजवळ १०,००,००० वर्ष जुन्या ऑडिटोरियम रॉक शेल्टरच्या शेवटी कपसारखे छोटे खळग आहेत;[१३] शिवालिक आणि पोठवार (पाकिस्तान) प्रदेश यथे अनेक पृष्ठवंशीय जीवाश्म राहते आणि अश्मयुगातील साधने सापडले आहेत . या काळात मानव बहुतेक वेळा चर्ट, जास्पर आणि क्वार्टझाइट वापरत असत.

नवाश्म काळ

केरळ, भारतातील एडक्कल लेण्यांचे पाषाण युगी लेखन.

असिरॅमिक नवाश्म काळ (मेहरगड पहिला, बलुचिस्तान, पाकिस्तान, याला "अर्ली फूड प्रोडक्शनिंग एरा" देखील म्हणले जाते) ७००० ते ५५००० इ.स.पू. पर्यंत होता. सिरॅमिक नवाश्म काळ इ.स.पू. ३३०० पर्यंतचा काळ आहे, ज्याची आरंभिक हडप्पा (कांस्यपाषाण युग ते आरंभिक ब्राँझ युग) कालावधीमध्ये संपृक्ति झाली. भारतात सगळ्यात जुन्या नवाश्म काळातील्या सुमारे ७वे सहस्रक इ.स.पू.च्या अवशेष स्थळांपैकी काही मध्य गंगा प्रदेशातील लाहुरादेवा आणि गंगा आणि यमुना नद्याच्या संगम जवळच्या झुसी येथे आहेत.[१४] सध्याच्या हरियाणा राज्यातील भिराना नावाच्या पुरातन सरस्वती नदीपात्रातील आणखी एक जागा सापडली आहे ज्याच्या नवाश्म पातळीचे कालनिर्धारण सुमारे ७६०० ई.स.पू. कालावधीचे झाले आहे.[१५]

केताराम रॉक पेंटिंग्ज, कर्णूल जिल्हा, आंध्र प्रदेश

दक्षिण भारतात नवाश्म काळाची सुरुवात इ.स.पू. ३००० पासून झाली आणि हा काळ सुमारे १४०० इ.स.पू. पर्यंत टिकला. आंध्र - कर्नाटक प्रदेशात नंतर दक्षिण तमिळनाडूमध्ये विस्तारल्या गेलेल्या दक्षिण भारतीय नवाश्म काळाचे वैशिष्ट्य म्हणजे इ.स.पू. २५०० पासूनचे खंगारक स्तूप आहेत. तिरुनलवेली जिल्ह्यातील आदिचनल्लूरमध्ये आणि उत्तर भारतातील केलेल्या तुलनात्मक उत्खननात महापाषाण संस्कृतीच्या दक्षिणेकडील स्थलांतराचा पुरावा मिळाला आहे.[१६] महापाषाण घटातील दफनांच्या अस्तित्वाचा अगदी स्पष्ट पुरावा म्हणजे इ.स.पू. १००० च्या आसपासचे पुरावे आहेत, ज्यांचा तामिळनाडूमधील विविध ठिकाणी शोध लागला आहे, विशेषतः तिरुनलवेलीपासून २४ किलोमीटर अंतरावर आदिचनल्लूर येथे, जिथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातील पुरातत्त्वशास्त्रज्ञांने मानवी कवट्या, सांगाडे आणि हाडे, कुसळे, जळलेल्या तांदळाचे धान्य आणि नवाश्मी कुठार असलेले १२ घट शोधून काढले, ज्यायोगे २८०० वर्षांपूर्वी नवाश्म काळ अस्तित्वात असल्याची पुष्टी झाली आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी भविष्यकाळात नवीन ज्ञानाचे स्रोत म्हणून आदिचनल्लूरकडे परत जाण्याची योजना आखली आहे.[१७][१८]

हे सुद्धा पहा

  • अफगाणिस्तानचा इतिहास
  • बांगलादेशचा इतिहास
  • भूतानचा इतिहास
  • भारताचा इतिहास
  • मालदीवचा इतिहास
  • नेपाळचा इतिहास
  • पाकिस्तानचा इतिहास
  • श्रीलंकेचा इतिहास
  • प्रागैतिहासिक आशिया

संदर्भ

 

  1. ^ Kennedy, K. A. R.; Deraniyagala, S. U.; Roertgen, W. J.; Chiment, J.; Disotell, T. (April 1987). "Upper Pleistocene Fossil Hominids From Sri Lanka". American Journal of Physical Anthropology. 72 (4): 441–461. doi:10.1002/ajpa.1330720405. PMID 3111269.
  2. ^ a b Kennedy 2000.
  3. ^ Manmohan Kumar : Archaeology of Ambala and Kurukshetra Districts, Haryana, 1978, Mss, pp.240-241.
  4. ^ Haryana Samvad Archived 2018-11-29 at the Wayback Machine., Oct 2018, p38-40.
  5. ^ Early Pleistocene Presence of Acheulian Hominins in South India
  6. ^ Pilgrim, Guy, E. 'New Shivalik Primates and their Bearing on the Question, of the Evolution of Man and the Anthropoides, Records of the Geological Survey of India, 1915, Vol.XIV, pp. 2-61.
  7. ^ Haryana Gazateer, Revennue Dept of Haryana, Capter-V.
  8. ^ Alice Roberts (2010). The Incredible Human Journey. A&C Black. p. 90.
  9. ^ James & Petraglia 2005.
  10. ^ Spencer Wells, The Journey of Man: A Genetic Odyssey. Random House, आयएसबीएन 0-8129-7146-9
  11. ^ Wendy Doniger (2010-09-30). The Hindus: An Alternative History. Oxford University Press. p. 66. ISBN 9780199593347.
  12. ^ Mark M. Jarzombek (2014-05-27). Architecture of First Societies: A Global Perspective. John Wiley & Sons. p. 62. ISBN 9781118421055.
  13. ^ Archaeological Survey of India, Government of India. "World Heritage Sites - Rock Shelters of Bhimbetka". Archaeological Survey of India, Government of India. 4 March 2014 रोजी पाहिले.
  14. ^ Fuller, Dorian (2006). "Agricultural Origins and Frontiers in South Asia: A Working Synthesis" (PDF). Journal of World Prehistory. 20: 42. doi:10.1007/s10963-006-9006-8.
  15. ^ "Haryana's Bhirrana oldest Harappan site, Rakhigarhi Asia's largest: ASI". Times of India. 15 April 2015.
  16. ^ Sastri, Kallidaikurichi Aiyah Nilakanta (1976). A History of South India. Oxford University Press. pp. 49–51. ISBN 978-0-19-560686-7.
  17. ^ Subramanian, T. S. (2004-05-26). "Skeletons, script found at ancient burial site in Tamil Nadu". The Hindu. 2004-07-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-07-31 रोजी पाहिले.
  18. ^ Zvelebil, Kamil A. (1992). Companion Studies to the History of Tamil Literature. Brill Academic Publishers. pp. 21–22. ISBN 978-90-04-09365-2. The most interesting pre-historic remains in Tamil India were discovered at Adichanallur. There is a series of urn burials. seem to be related to the megalithic complex.

नोंदी

बाह्य दुवे