दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२ | |||||
भारत | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | ९ – १९ जून २०२२ | ||||
संघनायक | ऋषभ पंत | टेंबा बवुमा (१ली-४थी ट्वेंटी२०) केशव महाराज (५वी ट्वेंटी२०) | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ | ||||
सर्वाधिक धावा | ईशान किशन (२०६) | हेन्रिक क्लासेन (११८) | |||
सर्वाधिक बळी | हर्षल पटेल (७) | ड्वेन प्रिटोरियस (५) | |||
मालिकावीर | भुवनेश्वर कुमार (भारत) |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ जून २०२२ पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. सप्टेंबर २०२१ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हा दौरा निष्चित केला. मालिकेपूर्वी दुखापत झाल्याने लोकेश राहुलच्या जागी ऋषभ पंतला भारताचा कर्णधार नेमले.
दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतल्याने सलग सर्वाधिक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने जिंकण्याचा विश्वविक्रम भारताकडून हुकला गेला. दुसराही सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात भारताने विजय मिळवून मालिका २-२ अश्या बरोबरीच्या स्थितीत आणून ठेवली होती. शेवटच्या ट्वेंटी२० सामन्यात पावसाचा व्यत्यत आल्याने केवळ ३.३ षटकांनंतरच उर्वरीत सामना रद्द करावा लागला. त्यामुळे पाच सामन्यांची आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.
संघ
आं.टी२० | |
---|---|
भारत[१] | दक्षिण आफ्रिका[२] |
|
लोकेश राहुल आणि कुलदीप यादव यांना दुखापतीमुळे भारतीय संघातून वगळण्यात आले.[३]
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
भारत २११/४ (२० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २१२/३ (१९.१ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- ट्रिस्टन स्टब्स (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
भारत १४८/६ (२० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १४९/६ (१८.२ षटके) |
हेन्रीच क्लासेन ८१ (४६) भुवनेश्वर कुमार ४/१३ (४ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
भारत १७९/५ (२० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १३१ (१९.१ षटके) |
हेन्रिक क्लासेन २९ (२४) हर्षल पटेल ४/२५ (३.१ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
४था सामना
भारत १६९/६ (२० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका ८७ (१६.५ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण
- मार्को यान्सिन (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
५वा सामना
भारत २८/२ (३.३ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे उर्वरीत सामना रद्द.
संदर्भ
- ^ "न्यू फेसेस गॅलोर फॉर इंडियाज टी२० सिरीज अगेन्स्ट साऊथ आफ्रिका; स्क्वाड नेम्ड फॉर रिशेड्युल्ड इंग्लंड टेस्ट". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. १३ जून २०२२ रोजी पाहिले.
- ^ "स्टब्स रिसिव्हज मेडन प्रोटाज कॉलअप फॉर टी२० सिरीज". क्रिकेट साऊथ आफ्रिका. 2022-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ जून २०२२ रोजी पाहिले.
- ^ "KL Rahul ruled out out of South Africa T20Is, stand-in skipper named". International Cricket Council. 9 June 2022 रोजी पाहिले.
१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३ |