Jump to content

दंती

दंती (Baliospermum montanum) : हे एक लहान कणखर ०·९ ते १·८ मीटर उंचीचे झुडूप असून त्याचा प्रसार हिमालयात काश्मीर ते भूतानमध्ये ९३० मी. उंचीपर्यंत, आसाम, खासी टेकड्या, उत्तर बंगाल, बिहार, मध्य भारत, पश्चिम द्वीपकल्प (?), बांगला देश, ब्रह्मदेश, मलेशिया इ. प्रदेशांत आहे.

दंती, दांती, दंतिका, नागदंती, शामला, दातरा, तान्वा अशा अनेक नावाने ही वनस्पती ओळखली जाते. ही वनस्पती बहुवर्षायू असून या वनस्पतीच्या फांद्या मुळापासून उभट व पाने एकाआड एक असतात. फुले रुंद अंडाकृती व लांब देठावर असतात. फळे लहान लांबट-गोल व पिवळसर असतात. या वनस्पतीचे मूळ, पाने व बिया औषधांत वापरतात. मुळे व पाने तीव्र रेचक आहेत. कावीळीतही गुणकारी असतात.

दंतिमुळाला हिंदीत हकुम, हाकुन; कानडीत कडुहरलू, गुजरातीत दांतिमूळ, आणि संस्कृतमध्ये दंतिका, रेचनी, विशल्या, विशोधिनी म्हणतात.