Jump to content

द स्मर्फ्स

द स्मर्फ्स (फ्रेंच:ल श्ट्रूम्फ्स; डच:डि स्मर्फेन) ही बेल्जियन रेखाचित्र आणि दूरचित्रवाणीमालिका आहे. स्मर्फ हे काल्पनिक मानवसदृश छोटे निळे प्राणी असून त्यांच्या एका वसाहतीवर या मालिका केन्द्रित आहेत. यात शंभरापेक्षा अधिक वेगवेगळ्या स्मर्फचे चित्रण आहे. हे प्राणी जंगलात कुत्र्याच्या छत्रीगत असलेल्या घरांतून राहतात.

याची सुरुवात रेखाचित्र मालिका स्वरूपात पिएर कुलिफोर्डने पेयो या टोपणनावानिशी ल श्ट्रूम्फ्स या नावाने केली.