Jump to content

द पेरिफेरल सेंटर : व्हॉइसेस फ्रॉम इंडियाज नॉर्थईस्ट

द पेरिफेरल सेंटर  : व्हॉइसेस फ्रॉम इंडियाज नॉर्थईस्ट[] हे पुस्तक प्रीती गिल यांनी संपादित केले असून विविध लेखकांनी आपले लेख यात समाविष्ट केले आहेत. प्रस्तुत पुस्तकात मणिपुरी स्त्रिया स्वतःच बंडाचे निशाण उभारून प्रश्न विचारतात, अशी त्यांची एक प्रतिमा पुढे येते.

प्रस्तावना

भारताच्या ईशान्य भागातील राज्यांना सात बहिणी म्हणून संबोधले जाते. १९४७ मध्ये फाळणी झाल्यानंतरच्या काळापासून ईशान्य भारतास उर्वरीत देशाशी दळवळणासाठी एका चिंचोळ्या भागावर अवलंबून रहावे लागत आहे. या भागातील काही स्थानिक अतिरेकी अधिक राजकीय स्वातंत्र्य मागत आहेत. अतीरेकी आणि देशाची सुरक्षादले यांच्यात कायम तणाव असतो. २००४मध्ये या भागातील आसाम रायफलच्या अर्धलष्करी दलाने अतीरेकी दलाम्शी कथित संबंध असल्यामुळे अटक केलेल्या तंजगम्मा मनोरमा [] या तरुणीचा अटकेत असताना मृत्यू झाला, जो विवाद्य ठरला. या प्रकरणात तिच्या मृत्यूनंतर जी आंदोलने झाली, हिंसाचार झाला त्यातून या पुस्तकाची प्रेरणा घेतली गेली आहे.

ईशान्य भारतातील स्त्रिया आणि पुरुष रोज ज्या अनेक प्रकारच्या मुद्यांवर लढत आहेत हे सांगण्यासाठी काहीतरी माध्यम उपलब्ध करून द्यावे आणि त्यावर त्यांनी त्यांच्यावरील दडपणे, असुरक्षितता आणि अनिश्चितता यांची चर्चा करावी अशी मागणी या पुस्तकात केली गेली आहे. या भागात अतीरेकी गट एक प्रकारचे छुपे युद्ध करत आहेत त्याचीही चर्चा व्हावी असे पुस्तकात म्हणले आहे.

तंजगम्माच्या घटना २००४ मध्ये झाली तरी जनमानसामध्ये अजूनही तेव्हा झालेल्या आंदोलनाची प्रतिमा ठसलेली आहे. सदर पुस्तकात मणिपुरी स्त्रिया स्वतःच बंडाचे निशाण उभारून प्रश्न विचारतात अशी एक प्रतिमा पुढे येते.

ठळक मुद्दे

प्रत्येक प्रकरणात राष्ट्रीयत्वाची ओळख आणि मुख्य भूमीपासून मणिपुरी जनता नाराज का आहे या विषयी सविस्तर चर्चा/मांडणी केली आहे. काही लेखांत मुद्दे सडेतोडपणे मांडले आहेत तर काही लेखांत आडवळणाने. या पुस्तकातील अनेक लेखक ईशान्य भारतातील लेखक, कार्यकर्ते आणि अभ्यासक आहेत, तर अनेक या पुस्तकाच्या संपादकासारखे बाहेरचे आहेत. या भागात भारतातील सेना बंडखोरीचा मुकाबला करत असून राष्ट्राचे रक्षण करत आहे.

ईशान्य भारतातील लोक वेगवेगळे आहेत का? सांस्कृतिक विविधता, धर्म, शरीररचना भौगोलिक अंतर यामुळे मुख्यभूमी आणि ते यांच्यात अंतर पडते. या भागाची माहिती मुख्यभागाला फारशी नाही हे खरे आहे असे नाही. गेल्या ३० वर्षात इथे घडत असलेल्या हिसाचार व अशांततेमुळे मोठी हानी झाली आहे. इशान्ये मधील काही राज्यांमध्ये गेली तीन दशकं ज्या ज्या चकमकी आणि हिंसाचार घडला आहे, त्यामुळे अनेक काळजीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. इथे चालू असलेले / चाललेले प्रदीर्घ अतिरेकी हिंसचारामुळे स्थानिक समूहांवर उध्वस्त करणारे दीर्घकालीन परिणाम झाले आहेत. हा परिणाम विशेषतः स्त्रियांवर झालेला दिसून येतो. ईशान्य भारतातील एकूणच परिस्थिती व तिथे राहणाऱ्या विविध समूहांचे जीवनमान हे सातत्याने संघर्षमय राहिले आहे. अतिरेकी कारवाया आणि त्यावर शासनाच्या सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे सामान्य जनतेची मात्र परवड होते.

सदर पुस्तकात जे काही चित्र प्रस्तुत केले आहे ते तसे नसून त्याकडे लिंगभावी दृष्टिकोनातून पाहणे कसे आशयाचे ठरते हे वाचकांच्या लक्षात येण्यास या पुस्तकाची मदत होते. सदर पुस्तकाचे शीर्षक हे ईशान्य भारतातील जे आवाज आहेत ते आवाज केंद्रातील प्रशासनाला उद्देशून असून, ज्यांना मुख्य समजले जाते अशा एकूणच भारतीय जनतेचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणारे आहेत. अनेक वर्ष ईरोम शर्मिला[] या ईशान्य भारतातील प्रश्नांसाठी उपोषण करत आहेत. विविध मानव अधिकार संघटनादेखील ईरोम शर्मिला यांना पाठिंबा दर्शविण्याबरोबरच त्यांच्या मागण्या शासनाकडे सातत्याने मांडत आहेत.[]

प्रतिसाद किंवा योगदान

महत्त्वाच्या संकल्पना

राजकीय स्वातंत्र्य, राष्ट्रवाद, सुरक्षा, प्रशासन

संदर्भसूची

  1. ^ Gill, Preeti (2014-02-13). The Peripheral Centre: Voices from India's Northeast (इंग्रजी भाषेत). Zubaan. ISBN 9789383074655.
  2. ^ ""These Fellows Must Be Eliminated": Relentless Violence and Impunity in Manipur: III. The Killing of Thangjam Manorama Devi". www.hrw.org. 2018-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "Irom Sharmila resumes fast demanding repeal of AFSPA". The Hindu (इंग्रजी भाषेत). PTI. 2016-03-01. ISSN 0971-751X. 2018-04-06 रोजी पाहिले.CS1 maint: others (link)
  4. ^ "Peripheral Centre, The: Voices from India's Northeast | Zubaan". zubaanbooks.com (इंग्रजी भाषेत). 2018-04-06 रोजी पाहिले.