द पार्क (चेन्नई)
द पार्क हे भारताच्या चेन्नई शहरातीलतील अण्णा सलाई येथे अण्णा उडडाणपूलाच्या मोक्याच्या ठिकाणी जेमिनी स्टुडियोजवळील ऐषआरामी पंचतारांकित हॉटेल आहे.[१] [२] धंदयानिमित्त्ा भेटीगाठी घेण्यासाठी येथील जागा आदर्श मानली जाते. स्थानिक कला आणि परंपरा यांचा सुंदर मिलाफ या हॉटेलमध्ये घडवून आणला आहे. आणि तरीसुद्धा मोठया १० शहरांमधील आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेले हे हॉटेल आहे. [३] तसेच १५ मे, २००२ रोजी अपीजय सुरेन्द्र समूहाने रू.१००० दशलक्ष इतकी गुंतवणूक असलेले हॉटेल चालू केले.[४]
इतिहास
आज जी पार्क हॉटेलची इमारत उभी आहे त्या जागी १९४० पासून एक ऐतिहासिक चित्रपट स्टुडिओ, जेमिनी स्टुडिओ होता. तामिळ चित्रपट निर्माता , एस.एस.वसन यांनी त्याचा मित्र असलेल्या के. सुब्रमण्यम या मोशन पिक्चर्सच्या निर्मात्याचा स्टुडिओ विकत घेतला होता जो १९४० मध्ये लागलेल्या आगीमध्ये जळून गेला. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार या जागेचा लिलाव करण्यात येउुन कामगारांना न दिलेल्या मेहनातावरील व्याज हिशेाबात धरून रु ८६,४२७/- इतकी रक्कम गोळा करण्यात आली. या स्टूडिओची पुर्नबांधणी करण्यात येउून तो जेमिनी स्टूडिओ या नावाने ओळखला जाउु लागला. हा या देशातील सर्वांत सुंदर स्टुडिओ आणि उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे केंद्र म्हणून नावारूपाला आला. १९७० पासून मात्र या स्टुडिओचा आर्थिक डोलारा कोसळला. १९९० मध्ये स्टुडिओच्या प्रांगणातील मोकळया जागेमध्ये दोन इमारती बांधण्यात आल्या. २१ व्या शतकाच्या सुरुवातीस केालकत्त्याला स्थायिक असलेल्या पार्क समूहाने ही सर्व मालमत्ता खेरदी केली आणि त्याच जागेवर १५ मे २००२ पासून ऐषआरामी पंचतारांकित हॉटेल उभे केले. त्याच वर्षी त्याच्याच बाजूचा एक भाग इंडियन बँकेने रु.९३० दशलक्ष इतक्या रकमेचा लिलाव केला असता त्यांना कब्ज्यात घेता आली.[५] [६]
२०१० मध्ये हॉटेलसमोरील मोकळया जागेमध्ये जिथे कारंजे बांधण्यात आले होते त्या जागेवर मालकी हक्क सांगण्यासाठी हॉटेलला चेन्नई महानगरपालिकेशी कायदेशीररीत्या लढून ताब्यात घ्यावी लागली. [७]
द हॉटेल
कलासंपन्न असलेल्या या हॉटेलमध्ये एकूण २१४ खोल्या असून १२७ डिलक्स खोल्या, ३१ ऐषआरामी खोल्या, ४१ निवासी खोल्या, ६ स्टूडीओ कक्ष, ५ डिलक्स कक्ष आणि १ प्रेसिडेंशिल कक्ष आहेत.[८] या हॉटेलमध्ये लोटस नावाचे एक थाई रेस्टॉरंट आहे. आठव्या मजल्यावर सिक्स- झिरो- वन बार, पास्ता- चोको बार आणि ॲक्वा रेस्टॉरंट आहे. शहरातील कातडयाच्या उदयोगाची आठवण राहावी या हेतूने या हाटेलमध्ये लेदर नावाचा बार आहे.[९] खरेदी करण्यासाठी दुकानेसुद्धा आहेत. [१०] खरेदी करण्यासाठी दुकानेसुद्धा आहेत.
या हॉटेलमध्ये वास्तव्य करणा-यांना जगामधील विविध देशामध्ये बनविण्यात येणा-या वेगवेगळया पद्धतीचे खादयपदार्थ खाण्याचा आणि अव्दितीय अशा मनोरंजनाच्या साधनांचा आनंद लुटता येतो. हॉटेलमध्ये कौशल्याने तयार केलेल्या प्रत्येक वस्तूमधून भूतकाळातील परंपरांचा प्रत्यय प्रत्येकाला आल्याशिवाय राहात नाही. प्रासादातील भिंतीवर लावलेली चित्रे, मन थक्क करणारी कलासंपन्न दालने, भव्य स्पा यांचा अनुभव सर्वांना स्वर्गसुखाची प्राप्ती करून देणारा आहे. [११]
पुरस्कार
२००६ मधील फॉर्ब्सच्या यादीमध्ये 10 सर्वांत महागडया रेस्टॉरंटपैकी चेन्नई मधील पार्क हॉटेलमधील ईटालीयन शेफ अन्टानिओ कारलुसिओ यांनी तयार केलेला ‘ॲटरीम’चा समोवश करण्यात आला होता.[३]
संदर्भ व नोंदी
- ^ "पंचातारांकित डिलक्स" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ फरवाहा, दिनकर (१-१५ सप्टेंबर २००8). ""अपाजय सुरेंद्राची भविष्याकडे वाटचाल"" (इंग्लिश भाषेत). 2012-04-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-01-07 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ a b साबिरा चौधरी (१८ डिसेंबर २००६). "आंतरराष्ट्रीय दर्जाचे जेवण: भारतातील सर्वांत महागडे रेस्टॉरंट" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "चेन्नईच्या हॉटेलमधील सर्वोत्तम बूटीक" (इंग्लिश भाषेत). 2014-06-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ डिसेंबर २०११ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ मुथिह, एस. (८ जुलै २००२). "जेमिनी विस्मृतीच्या गर्तेत" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ अशोकमित्रन (२००२). "जेमिनी स्टुडिओच्या मालकाच्या सहवासात घालवलेली माझ्या आयुष्यातील काही वर्षे. सिनेमा बुक्स ऑफ ओरीएन्ट लॉंगमॅन. ओरीएन्ट लॉंगमॅन. आयएसबीएन ८१-२५०-२०८७-एक्स" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "चेन्नई महानगरपालिकविरुध्दची हॉटेलची याचिका फेटाळली" (इंग्लिश भाषेत). ४ ऑगस्ट २०१२. रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ द पार्क हॉटेल चेन्नई मधील सुविधा
- ^ "चेन्न्ईच्या संपत्तीचे प्रदर्शन पार्क हॉटेलमधून" (इंग्लिश भाषेत). ४ ऑगस्ट २०१२. रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "द पार्क हॉटेल, चेन्नई- चेन्नईमधील पंचतारांकित हॉटेल" (इंग्लिश भाषेत). ४ ऑगस्ट २०१२. रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ द पार्क हॉटेल.