द दा विंची कोड
द दा विंची कोड | |
लेखक | डॅन ब्राऊन |
अनुवादक | अजित ठाकूर |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | कादंबरी |
प्रकाशन संस्था | मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे |
प्रथमावृत्ती | मे, २००६ |
चालू आवृत्ती | जून, २००६ |
मुखपृष्ठकार | चंद्रमोहन कुलकर्णी |
पृष्ठसंख्या | ४४६ |
आय.एस.बी.एन. | ८१-७७६६-६९६-७ |
कथानक
येशू ख्रिस्ताचा मेरी मॅन्डिलीनशी विवाह झाला होता. या जोडप्याला एक मुलगी झाली व त्यांचा वंश आजतागायत हयात आहे. यासंबंधीचा पुरावा प्रायरी ऑफ सायन या संघटनेने प्राचीन काळापासून लपवून ठेवला आहे. कॅथॉलिक चर्चचे सर्वेसर्वा या पुराव्याच्या मागावर आहेत, तो नाहीसा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कारण येशूला त्यांनी देवपद दिले आहे. विवाहासारख्या मानवी घटनांचे चर्चने येशूच्या जीवनातून उच्चाटन केले आहे. क्रिप्टॉलॉजी उर्फ सांकेतिक भाषेचे व चिन्हांचे शास्त्र, रोमन लोकांच्या पेगन धर्माचा कॅथॉलिक धर्माने ऱ्हास घडवला तो इतिहास, लिओनार्डो दा विन्ची या प्रख्यात इटालियान चित्रकार-शिल्पकार-शास्त्रज्ञाच्या चित्रांची आशयघनता, गणित, स्थापत्यशास्त्र, भूगोल वगैरे प्राचीन शास्त्रांची माहिती इत्यादी विषयांचा आधार घेत कथानायक रॉबर्ट लॅंग्डन याचा पाठपुरावा करतो.