Jump to content

द डिपार्टेड

द डिपार्टेड
दिग्दर्शनमार्टिन स्कॉर्सेसी
प्रमुख कलाकार लिओनार्दो दि काप्रिओ
मॅट डेमन
जॅक निकल्सन
मार्क वालबर्ग
देश अमेरिकेची संयुक्त संस्थाने
भाषा इंग्लिश



द डिपार्टेड हा २००६ मध्ये प्रदर्शित झालेला ऑस्कर पुरस्कारविजेता चित्रपट आहे. यात प्रमुख भूमिका लिओनार्दो द कॅप्रियोची असून बॉस्टन शहरातील पोलीस व गुन्हेगारी जगतातील संघर्षावर आधारित आहे. यात गुन्हेगारी जगतातील डॉन कोस्टेलोचा साथीदार पोलीस सेवेत रुजू होतो व स्पेशल इनव्हेस्टिगेशन युनिटमध्ये वरच्या हुद्यावर काम करत असतो व कोस्टेलोसाठी हेरगिरी करत असतो. त्याचप्रमाणे पोलिसांनीही आपला खबऱ्या कोस्टेलोच्या गटात सोडलेला असतो. पोलीस व कोस्टेलो दोघांनाही कळते की आपापल्या गटात कोणीतरी खबऱ्या आहे व दोन्ही गटात या दोघांवरतीच खबऱ्या हुडकून काढण्याची जबाबदारी असते. त्या ओघाने खरी जबाबदारी असते की आपल्या समोरच्या गटात खरा खबऱ्या कोण आहे. एकूण ४ ऑस्कर पुरस्कार ह्या चित्रपटाने मिळवले.