Jump to content

द इल्युजनिस्ट

द इल्युजनिस्ट
दिग्दर्शन नील बर्गर
प्रमुख कलाकार एडवर्ड नॉर्टन
जेसिका बिल
भाषा इंग्लिश
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}



द इल्युजनिस्ट हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झालेला एक अमेरिकन चित्रपट आहे. हा चित्रपट एका काल्पनिक कथेवर आधारित आहे. एक गरीब कुटुंबातील जादूगार व उमराव घराण्यातील मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडतात परंतु राजघराण्याच्या दडपशाहीने त्यांचे प्रेम विभाजीत केले जाते. काही वर्षांनंतर हा जादूगार पुन्हा आपल्या गावी येउन आपल्या जादूच्या प्रभावामुळे प्रसिद्ध होतो. त्याचे प्रेम त्याला पुन्हा मिळते. परंतु पुन्हा एकदा राजघराणे त्यांच्या प्रेमात आडवे येते. परंतु हा कसलेला जादूगार जादूने आपल्या प्रेमाला पुन्हा मिळवतो.

कथा


चित्रपटाचा नायक एडवर्ड हा एका ऑस्ट्रीयामध्ये गरीब सुताराच्या घरात जन्मलेला असतो. वडिलांना सुतारकामात मदत करणे हे त्याचे काम. एके दिवशी शेतातून चालत असताना. एक झाडाखाली बसलेला म्हातारा माणूस त्याला काही जादूचे प्रयोग दाखवतो परंतु काही वेळाने तो म्हातारा व झाड गायब होऊन जाते. एडवर्डला याचे आश्चर्य वाटते व तो जादू बद्द्ल झपाटून जातो. स्वतः अनेक प्रयोग करून तो जादूचे प्रयोग शिकू लागतो. एकेदिवशी असेच गवताच्या काडीवर अंडे घेउन जाण्याचा सराव करत असताना, सोफी ही उमराव घराण्यातील मुलगी त्याला पहाते. तिला तो करीत असलेल्या गोष्टींबद्दल आश्वर्य वाटते व त्याच्याकडे आकर्षित होते. हळूहळू त्या दोघांची दोस्ती वाढते व लहानपणीचे प्रेम दोघांत निर्माण होते. परंतु ही मुलगी उमराव घराण्यातील असल्याने तिच्या घरच्याना त्याच्याबरोबरचे लफडे पटत नाही व ते मारून धमाकावून एडवर्डला सोफीपासून वेगळे करतात. लहान असल्याने एडवर्ड घाबरून तेथून पळून जातो.

वर्षे लोटतात एडवर्ड अनेक देश फिरतो व विविध देशातील जादूंचे प्रकार शिकून पुन्हा ऑस्ट्रीयामध्ये येतो. व आयसेनहाईमच्या नावाने जादूचे प्रयोग चालू करतो. पहिल्या काही खेळातच तो प्रेषकांवर जबरदस्त छाप सोडतो व अल्पावधीतच प्रसिद्द होऊन जातो.उमराव तसेच राजघराण्यातील लोकही त्याचे प्रयोग पहायला येउ लागतात. एका खेळात सोफी आलेली असते व एडवर्डला आपली जादू दाखवण्यासाठी प्रेषकांमधील कोणीतरी पाहिजे असतो. यासाठी सोफी तयार होते. सोफी समोर आल्यावर एडवर्डला आपले लहानपण आठवते. सोफीला अजूनही एडवर्ड ओळखू येत नाही. खेळानंतर राजाशी मानमुजरा चाललेला असताना सोफिला लहान एडवर्डची झलक आठवते व ती त्याला ओळखते. काही दिवसांनी एडवर्ड सोफीला भेटतो. भेटीत कळते की सोफीला राजाने लग्नासाठी मागणी घातली आहे. या नंतर सोफी व एडवर्डच्या नित्य भेटी होत रहातात. दरम्यान एडवर्डची लोकप्रियता शिखरावर पोहोचते. सोफी व एड्वर्डमध्ये चाललेल्या भेटींची एक पोलीस अधिकारी पॉल हेरगीरी करत असतो. तो राजाला या बाबतीत कल्पना देतो. पॉल आता एड्वर्डला चौकशीच्या नावाखाली त्रास देण्यास सुरुवात करतो. एड्वर्डच्या जादूचे रहस्य काढून घेण्याचा प्रयत्न करू लागतो. दरम्यान एड्वर्डला सोफीबद्दल पुन्हा प्रेम निर्माण होते परंतु राजाने तिला मागणी घातली असल्याने पुन्हा विचारण्याची हिंमत होत नसते. एडवर्डला एके दिवशी संयम अनावर होउन सोफीला कोड्यात विचारतो आणि त्यावेळेस सोफीच्या गळ्यात लहानपणी दिलेले लॉकेट मिळते. एडवर्डला सोफिचे देखील त्याच्यावर प्रेम आहे याची ग्वाही मिळते व दोघेही पुन्हा एकदा प्रेमात पडतात.

त्या दोघांच्या प्रेमाला व लग्नाला शाही विरोध होणार हे नक्की असल्याने दोघेही ऑस्ट्रीया सोडून जाण्याचा निर्णय घेतात. राजाला याची कुणकुण लागते व तो सोफीला बोलणे धाडवतो. सोफी भेटायला येते व दोघांच्यात मोठे भांडण होते. सोफी राजाच्या लग्नाच्या प्रस्तावाला नामंजूर करून निघून जाते, मद्यधुंद राजाला राग अनावर होत नाही तो नशेच्या अंमलातच घोड्यावरून चाललेल्या सोफीला मारून टाकतो. राजवाड्यातील काही सेवक ही घटना पहातात.

एडवर्ड निघण्याची तयारी करत असतानाच ओढ्यात सोफीचे शव सापडल्याची बातमी कानावर येतो. सर्वजण घटनास्थळी पोहोचतात पोलीस अधिकारी पॉल खुनी कोण याचा शोध लावण्याच्या कामावर लागतो. सोफीच्या म्रुत्युमुळे एडवर्डचे आयुष्य उधवस्त होते. एकाकी निराशेच्या गर्तेत जीवन व्यतीत करु लागतो. आपले जादूचे खेळही बंद करतो. सगळ्या सहकलाकारांना काढून टाकतो.

सोफीच्या खुनाचा संशय सर्वांचाच राजावरतीच असतो परंतु कायद्याने राजवाड्याची झडती घेणे तसेच राजाची चौकशी करणे शक्य नसते. काही महिन्यांनंतर एडवर्ड चीनी जादूगार आणतो व नवीन प्रयोगाची घोषणा करतो. मोठ्या प्रलंबानंतर आयसेनहाईम येणार व काय सादर करणार याची सर्वांनाच उत्सुकता असते. प्रयोगाच्या दिवशी स्टेजवर खुर्चीशिवाय काहीच नसते. काही वेळाने एड्वर्ड येतो व खुर्चीवर बसून ध्यान करु लागतो व काही वेळातच एक माणसाची प्रतिकृती स्टेजवर तयार होते. सर्वचजण हक्कबक्क होउन जातात. तो माणूस बोलू लागतो. प्रेषक त्याला प्रश्ण विचारू लागतात. तो मृत आहे की जिवंत आहे या प्रश्णावार गोधळून जातो व ती प्रतिकृती विरून जाते. या प्रयोगाची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरते. सर्वत्र लोकांमध्ये याची चर्चा होऊ लागते. काहींच्या मते आयसेनहाईम भूतांना आवाहन करतो याची आवई उठते. पुढील अनेक प्रयोगात याची लोकप्रियता अजून वाढते. अनेक मृत लोकांना प्रेक्षक स्टेजवर पहातात. अधिकारी पॉल यानंतर अजूनच एडवर्डला त्रास देऊ लागतो. तो कसे करतो याचे रहस्य जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. एके दिवशी एडवर्ड मृत सोफीला स्टेजवर आवाहन करतो. या खेळासाठी राजा वेष बदलून पहायला आलेला असतो. सोफी म्हणते की माझा खुनी या हॉलमध्ये आहे. राजा जबरदस्त भेदरून जातो व पुन्हा असा प्रयत्न केल्यास एडवर्डला बंदीचा आदेश देतो.

याच्या पुढील खेळामध्ये प्रचंड गर्दी होते व पॉल पोलिसांचा प्रचंड ताफा घेउन येतो. एडवर्ड आपली सर्व मालमत्ता मित्राच्या नावावर करून प्रयोगास येतो. पॉलच्या आदेशाविरोधात जाऊन एडवर्ड पुन्हा एक मृत सोफीला आवाहन करतो. सोफी पुन्हा एकदा येते. एडवर्ड आपल्या प्रेमाकडे अत्यंत विव्हळ नजरेने पहात असतानाच प्रेक्षक प्रश्ण विचारणे चालू करतात. तुझी हत्या कोणी केली? असे कोणीतरी सोफीला विचारतो. सोफी या वेळेस आपले गळ्यातले लॉकेट कुठे आहे हे पहात असते. आदेश मोडल्याने पॉल रंगभूमीचा ताबा घेतो, सोफीची प्रतिकृती नाहीशी होते. पॉल एड्वर्डला बंदी करण्याचा निर्णय घेतो व त्याला बेड्या घालणार इतक्यात एडवर्डही स्टेजवर एका प्रतिकृतीच आहे हे लक्षात येते.

एडवर्डचा शोध सर्वत्र चालू होतो. एवढ्या मोठ्या पोलीस ताफ्यातून एड्वर्ड कसा निसटतो हे सर्वांनाच कोडे पडते. सोफी खून व एडवर्डच्या गायब होण्याच्या प्रकरणामुळे सर्वत्र राजाबद्दल प्रक्षोभ जबरदस्त वाढतो. पॉलला राजवाड्यात चौकशी करण्याची मुभा मिळते. राजवाड्यात सोफी मरण्या आगोदर जेथून घोड्यावर बसलेली असते तिथे सोफीचे लॉकेट मिळते व पॉलला शेवटच्या खेळात सोफी लॉकेट का शोधत होती याचा उलगडा होतो. नोकरांशी चौकशीमध्ये भांडण झाल्याची साक्ष मिळते. व शेवटी सोफीच्या मृतदेहावर मिळालेला पाचूचा खडा हा राजाच्या तलवारीचा भाग असतो. एवढे सगळे पुरावे मिळाल्यावर पॉलचा राजावर खून केल्याचा संशय पक्का होतो व राष्ट्रध्यक्षांना तो राजाच्या बंदीच्या आदेशासाठी विनंती करतो. राजाला कळते की सगळे आपल्या विरोधात जाणार आहे व बंदीत रहाण्याऍवजी आत्महत्येचा मार्ग पत्करतो.

चित्रपटाच्या शेवटी राजाच्या म्रुत्युमुळे हताश झालेला पॉल परतत असताना एक लहान मुलगा एडवर्डच्या जादुंच्या रहस्यांचे पुस्तक देउन पळून जातो व लवकरच त्याला लक्षात येते की एडवर्ड एका म्हाताऱ्याच्या वेषात पळून जात आहे. एडवर्ड सरतेशेवटी ट्रेनमध्ये बसून ऑस्ट्रीया सोडून निघून जातो. पॉलला पुस्तकात बघितल्यावर एडवर्डच्या जादूंचा उलगडा होतो व एडवर्ड काय चीज आहे हे लक्षात येते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो एडवर्डकडून वापरला गेल्याचे लक्षात येते. सोफीचे मरणे, एडवर्डचे मानवी प्रतिकृती बनवणे हा एक एडवर्डच्या कटाचा भाग होता हे लक्षात येते. पॉल खजील होतो व एडवर्डचे चातुर्य व जादूची किमया याला सलाम ठोकून त्याला पकडण्याचा नाद सोडून देतो. एडवर्ड शेवटी दूर कुठल्यातरी देशात सोफीला सुरक्षित ठेवलेले असते. तिथे दोघेही शेवटी भेटतात ते पुन्हा कोणाकडून विभक्त न होण्यासाठी.