द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स
द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स हे ऑक्टोबर इ.स. १९४८मध्ये प्रकाशित झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक आहे. यात अस्पृश्यता उत्पत्तीच्या सिद्धांताबद्दल विवेचन आहे. डॉ. आंबेडकरांनी या पुस्तकात संदर्भांसहित हे सिद्ध केले कि, अस्पृश्य पूर्वी पराभूत लोक होते आणि बौद्ध धर्म तसेच गोमांस खाणे न सोडल्याने त्यांना अस्पृश्य मानले गेले. डॉ. आंबेडकरांच्या मते, अस्पृश्यतेचा उगम इ.स. ४०० च्या दरम्यान झाला असावा. बौद्ध धर्म आणि ब्राह्मण धर्म यात श्रेष्ठत्वासाठी जो संघर्ष झाला त्यापासून अस्पृश्यतेचा जन्म झाला असे या पुस्तकात सिद्ध केले गेले आहे.[१]
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य
संदर्भ आणि नोंदी
- ^ Ambedkar, Bhimrao Ramji (1948). The Untouchables: Who Were They? and why They Became Untouchables (इंग्रजी भाषेत). Amrit Book Company.