थ्युरिंगेन
थ्युरिंगेनचे स्वतंत्र राज्य Freistaat Thüringen | |||
जर्मनीचे राज्य | |||
| |||
थ्युरिंगेनचे स्वतंत्र राज्यचे जर्मनी देशामधील स्थान | |||
देश | जर्मनी | ||
राजधानी | एरफुर्ट | ||
क्षेत्रफळ | १६,१७२.५ चौ. किमी (६,२४४.२ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | २२,१४,००० | ||
घनता | १३७ /चौ. किमी (३५० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | DE-TH | ||
संकेतस्थळ | http://www.thueringen.de |
थ्युरिंगेन (जर्मन: Freistaat Thüringen; इंग्लिश नाव: थ्युरिंजिया) हे जर्मनी देशामधील एक राज्य आहे. जर्मनीच्या मध्य भागात वसलेल्या थ्युरिंगेनच्या भोवताली जाक्सन, नीडरजाक्सन, जाक्सन-आनहाल्ट, बायर्न व हेसे ही राज्ये आहेत. १६,१७२ चौरस किमी क्षेत्रफळ व सुमारे २२ लाख लोकवस्ती असलेले थ्युरिंगेन जर्मनीमधील आकाराने ११व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १२व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. एरफुर्ट ही थ्युरिंगेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. वाईमार हे ऐतिहासिक शहर ह्याच राज्यात स्थित आहे.
थ्युरिंगेनचा मोठा भाग घनदाट जंगलाने व्यापला असून हे नैसर्गिक व हिवाळी खेळांचे जर्मनीमधील सर्वात मोठे स्थळ आहे.
दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव झाल्यानंतर हे राज्य पूर्व जर्मनीमध्ये सामील केले गेले. १९५२ साली पूर्व जर्मनीने राज्ये बरखास्त करून जिल्ह्यांची निर्मिती केली व थ्युरिंगेन राज्य तीन जिल्ह्यंमध्ये विभागले गेले. १९९० सालच्या जर्मन एकत्रीकरणापूर्वी सर्व राज्ये पूर्ववत केली गेली ज्यामध्ये थ्युरिंगेनला परत राज्याचा दर्जा मिळाला.