Jump to content

थोरात घराणे

मराठा साम्राज्याचा ध्वज

थोरात घराणे हे १८व्या शतकातील एक सूर्यवंशी क्षत्रिय मराठा घराणे आहे. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर चाललेल्या मुघल-मराठा संघर्षात या घराण्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांच्या या कामगिरीबद्दल राजाराम महाराजांनी या घराण्याला दिनकरराव हा किताब बहाल केला.[] १८व्या शतकाच्या सुरुवातीला धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, दाभाडेगायकवाड यांच्या सोबतीने गुजरात प्रांतात मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी थोरात घराण्याचा मोलाचा वाटा आहे.

इतिहास

थोरात घराणे हे शिवकाळातील मराठा घराणे पेशवाईत उदयाला आले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर चाललेल्या मुघल-मराठा संघर्षात या घराण्याने विलक्षण पराक्रम गाजवला. या घराण्याला दिनकरराव, अमिरुलउमराव व जंगबहादर हे किताब होते. १८व्या शतकाच्या सुरुवातीला गुजरात, खानदेश व बागलाण प्रांतात मराठा साम्राज्याच्या विस्तारात या घराण्याचा मोलाचा वाटा आहे. या घराण्याला सूरत, संगमनेर, जुन्नर, कडेवलीत, पुणे आणि विजापूर या प्रांतात सरंजाम होता. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत या घराण्यातील अनेक पुरुष कामी आले. या घराण्याच्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत त्यापैकी विरगावकर थोरात, वाळकीकर थोरात, वाळवेकर थोरात, पारनेरकर थोरात, नेवासकर थोरात आणि भूमचे थोरात या प्रमुख शाखा.

संदर्भ

  1. ^ Bhīmarāva Baḷavanta Kulakarṇī, Malhāra Rāmarava Ciṭaṇīsa (1983). Śrīmanmahārāja Sambhājīrāje āṇi Thorale Rājārāma yāñcĩ̄ caritre. Suvicāra Prakāśana Maṇḍaḷa.