थॉमस कूक इंडिया
थॉमस कुक (इंडिया) लि . ही एक भारतीय ट्रॅव्हल एजन्सी आहे, जिचे मुख्यालय मुंबई, भारत येथे आहे. विदेशी चलन, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सुट्ट्या, व्हिसा, पासपोर्ट, प्रवास विमा आणि MICE यांसारख्या प्रवास सेवा ही कंपनी प्रदान करते. १८८१ मध्ये थॉमस कूक यांनी स्थापन केलेल्या या कंपनीने भारतात आपले पहिले कार्यालय स्थापन केले आणि अखेरीस भारत, श्रीलंका आणि मॉरिशसमधील ९४ शहरांमध्ये २३३ पेक्षा जास्त ठिकाणी विस्तार केला. [१] थॉमस कूक इंडिया ही फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्ज लिमिटेडची उपकंपनी आहे, तिच्या पूर्ण मालकीची उपकंपनी, फेअरब्रिज कॅपिटल (मॉरिशस) लिमिटेड ही आहे. [२]
संदर्भ
- ^ "Thomas Cook Travel Agency Locations" Archived 2018-05-14 at the Wayback Machine. Vedding
- ^ "Thomas Cook India About Us". Thomas Cook India. 9 September 2019 रोजी पाहिले.