थेमिस्टोक्लीस
थर्मिस्टीकलीस अथवा थेमिस्टोक्लीस ग्रीसचा एक सेनानी होता. याने ग्रीस-पर्शिया युद्धात ग्रीक सैन्याचे नेतृत्व केले व अतिप्रचंड सैन्याचा नौदलीय युद्धात पराभव केला. आजवरच्या महान सेनानींमध्ये थर्मिस्टीकलीसचा समावेश होतो. मॅरेथॉनच्या युद्धानंतर त्याने तत्परता दाखवून अथेन्सच्या नौदलाला पर्शियन सैन्याची दुसरी मोठी लाट येण्या आगोदरच सज्ज केले.
लढाया
- मॅरेथॉनची लढाई
- आर्टेमिझियची लढाई - थर्मोपिलाईच्या लढाईच्या वेळेस झालेली जवळच्या खाडीतील नौदलीय लढाई
- सलामीची लढाई