थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम
थेट शेेतकऱ्यांच्या बांधावर ही अभिनव मोहीम विचारवंत व प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ पवार यांनी सन २०११ मध्ये कृषीदिन पासून सुरुवात केली. शेतकरी सन्मान, समुुुपदेशन व सहाय्यता या त्रिसुत्रावर ही मोहीम आधारित असून कृृृषी प्रधान देशात शेतकऱ्यांप्रति कृतज्ञताचे मूूूूल्येेेे नव्या पिढीत रूजावीत , आत्मबळ मिळावेत. शिवाय आत्महत्येच्या नकारात्मक विचारापासून दूर करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर ही अभिनव संकल्पना राबविल्या गेली. अन्नदाता शेतकऱ्याप्रति कृतज्ञतेचे मूल्ये नव्या पिढीत रुजावीत म्हणून त्यांनी 'सेल्फी विथ फार्मर', कृषिदिनाला 'एक गुलाब-एक फळझाड','बांधावरची वारी' 'बांधावर शेतीशाळा' ही अभिनव संकल्पना एकनाथ पवार यांनी 'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहिमेतून पुढे आणली. देशात पहिल्यांदाच एकनाथ पवार यांच्या संकल्पनेतून कृषी दिन थेट बांधावर साजरा केला गेला. पुढे शासन स्तरावर या मोहिमेची दखल घेण्यात आली.[१][२][३][४]
विधानपरिषद व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये उल्लेख
या मोहिमेचे राज्य विधीमंडळाच्या विधानपरिषदेत विशेष उल्लेख सन २०१७ मध्ये केला गेला. 'चांदा ते बांदा' ही मोहीम राबवून हजारो शेतकऱ्यांच्या बांधावर सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली. थेट बांधावर या मोहिमेतून विस हजार फळझाडांची मोफत लागवड करून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्रोत ही उपलब्ध करून दिली. सन २०१९ मध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 'रिव्ह्यूल्योशनरी इनिशीवेटीव्ह फाॅर फार्मर्स' या नावाने या संकल्पनेची नोंद झाली. तत्कालीन कृषी मंत्री स्व.पांडुरंग फुंडकर यांनी "थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम, कृषीप्रधान राज्याला कृषी क्षेत्रात नवी दिशा देणारी आहे. " या शब्दांत गौरव केला. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर या मोहीमेचेे प्रणेेेतेेे म्हणून एकनाथ पवार ओळखले जाते. शेेतकऱ्यांंसाठी खऱ्याअर्थानेे ते 'कृषीदूत' ठरले.[५][६][७][८][९]
शेतकऱ्यांचे मनोबल उंचावणारे प्रयत्न
महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत त्यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी शासन, समाजसेवी, कृषितज्ज्ञ अशा विविध माध्यमातून प्रयत्न केला जातो. शेतकऱ्यांच्या स्वावलंबनासाठी व आत्महत्येच्या विचारातून मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने यासाठी 'वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन' स्थापन केले असून त्याचे मुख्यालय अमरावती येथे आहे.[१०]
संदर्भ
- ^ "कृषीदूताच्या मोहीमेची शासनस्तरावर दखल". नागपूर: देशोन्नती. २०२०. 2021-10-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-10-31 रोजी पाहिले.
- ^ पठाण, शफी (२०१७). "देशात पहिल्यांदाच कृषीदिन थेट बांधावर". लोकमत न्यूझ.
- ^ Vasantrao Naik A Pioneer in Politics and the Father of Agro Industrial Revolution. BlueRose Publisher's, Delhi. 2020. pp. 416, 417. ISBN 978-93-90396-21-4.
- ^ "'शेतकऱ्यांचे कैवारी वसंतराव नाईक'". marathi.hindusthansamachar.in (इंग्रजी भाषेत). 2022-07-07 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ मोहोड, सागर (२०१९). "Krushidoot toiling to save farmers from ending lives". नागपूर: हितवाद , इंग्रजी वृत्तपत्र.
- ^ "फळझाडांची लागवड : बांधावर लागली २० हजार रोपटे". नागपूर: महाराष्ट्र टाईम्स. २०२०.
- ^ "नागपुरात शेतकऱ्याचा थेट बांधावर गौरव". नागपूर: ऍग्रोवन. २०१९.
- ^ "'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहिमेतून शेतकऱ्यांचा सन्मान". नागपूर: ई टीव्ही भारत. २०२०.
- ^ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर. नागपूर: वन्हार्टी. २०१८.
- ^ "वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन". 2021-11-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-11-22 रोजी पाहिले.