Jump to content

थेट लाभ अंतरण

थेट लाभ अंतरण (इंग्रजी:Direct Benefit Transfer लघुरुप: DBT) भारत सरकारने दिलेल्या सबसिडी थेट जनतेच्या बँक खात्यात वळवुन, पूर्वीच्या प्रणालीतील गैरप्रकार, विलंब कमी करणे/हटविणे असा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचे उद्घाटन १ जानेवारी २०१३ला झाले.

बांधणी

या योजनेचा मूळ उद्देश म्हणजे भारताच्या केंद्र सरकारच्या योजनेत पारदर्शकता आणणे व पैश्याच्या वितरणादरम्यान होणारी गळती रोखणे असा आहे.याद्वारे सबसिडी ही थेट गरीबी रेषेखालील भारतीय नागरिकाच्या बँक खात्यात वळती केली जाईल.