थामिन
थामिन | ||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||||
| ||||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||||
सेर्वुस इल्डी M'Clelland, १८४२ | ||||||||||||||
''सेर्वुस इल्डी'' | ||||||||||||||
इतर नावे | ||||||||||||||
थामिन |
थामिन भारताच्या मणिपूर राज्यात आढळणारे हरीण.याला इल्ड हरीण असेही म्हणतात. थामिन हे मणिपुरी नाव आहे. हे हरीण अत्यंत दुर्मिळ असून हरीणांच्या सारंग गटात याची वर्गावारी होते. मणिपूर मधील काही अतिरेकी संघटनांनी थामिनच्या संरक्षणाची जवाबदारी उचलली आहे. याचा मुख्यत्वे वावर म्यानमार (ब्रम्हदेश) मध्ये आहे तेथे देखील त्याची संख्या १५०० च्या आसपास असावी.
संदर्भ आणि नोंदी
- ^ Cat Specialist Group (2002). Neofelis nebulosa. इ.स. २००६ असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आय.यू.सी.एन. इ.स. २००६. 11 May 2006ला बघितले. Database entry includes justification for why this species is vulnerable
सांबर हरीण भारतात आढळणारी हरीणाची मुख्य जात आहे. याचे शास्त्रीय नाव Cervix unicolour असे आहे. भारतात आढळणाऱ्या हरीणांमध्ये आकाराने सर्वात मोठे हे हरीण आहे. खांद्या पर्यंत याची उंची साधारणपणे १ ते दीड मीटर पर्यंत भरते तर पूर्ण वाढलेल्या नराचे वजन सहजपणे ४०० ते ५०० किलो पर्यंत भरू शकते .याची वर्गवारी हरीणांच्या सारंग कुळात होते[२]. या कुळातील हरीणांच्या मादींना शिंगे नसतात. नरांची शिंगे भरीव असून दरवर्षी उगवतात व गळतात. शिंगाना अनेक टोके असतात. सांबरांच्या एका शिंगाला पुढे १ व मागे दोन अशी एकूण तीन टोके असतात. माद्या नेहेमी कळप करून रहातात त्यांचा कळप ८ ते १० जणांचा असतो. नर शक्यतो एकटेच असतात.सांबरांचे मुख्य खाद्य शाकाहारी असल्याने गवत, पाने, फळे इत्यादी आहे.
सांबराचे मुख्य शत्रु वाघ , बिबट्या, तळ्यांमधील मगरी , व रानकुत्री आहेत. आकार मोठा असल्याने वाघांचे सर्वात आवडते खाद्य आहे. वावर
सांबर हे मुख्यत्वे भारतात किंवा भारतीय उपखंडात आढळते. विविध भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांच्या शरीरात बदल घडले आहेत. त्यांचे नैसर्गिक वसतीस्थान हे दाट ते घनदाट जंगले आहे. त्यांची नोंद विषववृतीय अती घनदाट जंगलांपासून ते शुष्क पानगळीच्या जंगलात तसेच उत्तरेत सूचिपर्णी वृक्षांच्या जंगलात पण झाली आहे. भारतातील शुष्क काटेरी व वाळवंटी प्रदेश सोडून ते सर्व प्रकारच्या जंगलात आढळतात. परंतु दाट ते घनदाट जंगले ते जास्त पसंत करतात. तसेच पाण्याच्या जवळ राहणे ते पसंत करतात. म्हणूनच मुख्य राष्ट्रीय उद्यानात हे तेथील तलावांपाशी हमखास आढळून येतात. विणीचा हंगाम मादी सांबर
सांबरांचा विणीचा हंगाम सप्टेंबर ते डिसेंबर असतो. या काळात नरांच्या शिंगाची वाढ पूर्ण झालेली असते. अनेक नर मादीच्या कळपावर हक्क प्रस्थापीत करण्यासाठी शिंगांनी चढाओढ करतात. यात सर्वात शक्तिशाली नर मादींच्या कळपाचा म्होरक्या होतो. माद्या साधरपणे मे ते जुनच्या दरम्यान प्रसावतात. जेणेकरून पावसाळ्याच्या महिन्यात नवीन पिल्लांना भरपूर खायला मिळते. पिल्ले लहान असतान अंगावर ठिपके असतात. परंतु जसे मोठे होतात ते विरळ होत जातात. पिल्लांची वाढ लवकर होते व दीड वर्षामध्ये पूर्ण विकसीत होतात.