Jump to content

त्व आणि त्त्व

विशेषणापासून किंवा सामान्य नामापासून भाववाचक नाम करण्यासाठी विशेषणाला अनेकदा ‘त्व’ हा प्रत्यय लागतो. विशेषण जर संस्कृत असेल तर ते विशेषण त्याच्या मूळ रूपात असायला हवे. उदा० महा हे विशेषण असेल तर त्याचे महत्‌ हे मूळ रूप विचारात घावे लागते आणि मग आणि त्यालाच ‘त्व’ प्रत्यय लागू शकतो.

विषेषणाच्या मूळ रूपाच्या शेवटी ‘त्‌’ असेल तर भाववाचक नामात त्‌+त्व मिळून त्त्व येतो. मुळात ‘त्‌’ नसेल तर भाववाचक नामात त्व येतो.

त् नंतर ज्ञ आला तर त्चा ज् होतो आणि 'ज्ञ'चा 'ज्ज्ञ'. उदा०. त् + ज्ञ = ज्ज्ञ. त्यामुळे, तत् + ज्ञ = तज्ज्ञ.

मुळात 'त' नसेलच आणि असल्यास त्याचा पाय मोडलेला नसेल 'ज्ञ' हा 'ज्ञ'च राहतो. उदा० अज्ञ, गणितज्ञ (गणित + ज्ञ), प्रज्ञा, राजाज्ञा, संगीतज्ञ (संगीत + ज्ञ), संज्ञा, सुज्ञ, वगैरे.

त्त्व/त्ता असलेली भाववाचक नामे

  • तत्‌+त्व=तत्त्व (म्हणून तत्त्वज्ञान, तत्त्ववेत्ता, तत्त्वहीन वगैरे)
  • बुद्धिमत्‌+त्व=बुद्धिमत्त्व (बुद्धिमत्‌+ता=बुद्धिमत्ता)
  • महत्‌+त्व=महत्त्व, महत्त्वपूर्ण
  • विद्वत्‌=ता=विद्वत्ता
  • व्यक्तिमत्‌+त्व=व्यक्तिमत्त्व
  • सत्‌+त्व=सत्त्व (निःसत्‌+त्व=निःसत्त्व)

त्व असलेली भाववाचक नामे

  • कर्ता+त्व=कर्तृत्व
  • जड+त्व=जडत्व (असेच गुरुत्व-गुत्वाकर्षण, वगैरे)
  • दाता+त्व=दातृत्व (असेच मातृत्व, पितृत्व वगैरे)
  • देव+त्व=देवत्व
  • नेता+त्व=नेतृत्व
  • मनुष्य+त्व=मनुष्यत्व (असेच मित्रत्व, शत्रुत्व, हिंदुत्व, दासत्त्व, वगैरे)
  • ममता+त्व=ममत्व
  • व्यक्ति+त्व=व्यक्तित्व
  • स्त्री+त्व=स्त्रीत्व (असेच सतीत्व, नारीत्व, वगैरे.)
  • वक्ता+त्व=वक्तृत्व

पहा :- मराठीतील सदोष अक्षरलेखन

वर्गःशुद्धलेखन