Jump to content

त्रु, त्रू आणि तृ

त्रु, त्रू आणि तृ यांतील तृ हे जोडाक्षर नाही. खाली दिलेल्या शब्दांत तृ दिसेल.

  • कर्तृत्व, अकर्तृत्‍व, कर्तृत्त्ववान, कर्तृत्वशाली
  • तृण, तृणवत्‌, तृणांकुर
  • तृतीय
  • तृप्त, अतृप्त, तृप्ती,
  • तृषा,
  • तृष्णा
  • दातृत्व
  • पितृत्व, पितृभक्ती
  • भर्तृहारी
  • भ्रातृभाव
  • मातृत्व, मातृभूमी
  • वक्तृत्व/वक्‍तृत्व, वक्तृत्वस्पर्धा/वक्‍तृत्वस्पर्धा
  • विस्तृत

त्रु असलेले शब्द

  • त्रुटी, त्रुटियुक्त
  • शत्रुत्व, शत्रुपक्ष

त्रू असलेले शब्द

  • भित्रूभागूबाई
  • शत्रू, अजातशत्रू