Jump to content

त्रिशीर्षा गंधर्व

त्रिशीर्षा गंधर्व हा जहाजांवर रहायचा. त्रिशीर्षाला एक अत्यंत सुंदर बहीण होती. त्या काळी राक्षस स्त्रियांना पळवीत आणि त्यांच्याशी जबरीने लग्ने करीत. म्हणून त्रिशीर्षाने हा जहाजाचा किल्ला बांधला होता. ह्या किल्लयात तो कुणालाच प्रवेश करू देत नसे. इंद्राला मोठी अडचण येऊन पडली.

पण इंद्र फार युक्तिबाज होता. त्याने पोपटाचे रूप घेतले आणि तो त्रिशीर्षाच्या जहाजाजवळ गेला. जहाजात त्रिशीर्षाची बायको होती, तिच्याकडे तो गेला. हा हिरवागार पोपट पाहून तिला मौज वाटली. ती जवळ येताच पोपट बोलू लागला, तेव्हा तिला फारच गंमत वाटली.

पोपट म्हणाला, "बाईसाहेब, तुम्हाला माहीत आहे का की देवांची आणि असुरांची मोठी लढाई चालली आहे. " "चालेना का, हे देव आणि असुर सारखे लढत असतात. आपण समुद्रात दूर जहाजावर सुरक्षित आहोत."

"पण ही नेहमीसारखी लढाई नाही. हिच्यात कोण जिंकेल हे फक्त तुमच्या पतिराजांना माहीत आहे." "ठीक आहे, मग मी त्यांना विचारीन".

पोपट उडून गेला आणि एका जळवेच्या रूपात आला, व एका वल्ह्याला चिकटून राहिला. त्याने त्रिशीर्षा गंधर्व आणि त्या बायकोचा संवाद ऐकला. त्याला समजले की जो या लढाईत फितुर होईल त्याचा पक्ष जिंकेल. हे ऐकून पोपट उडून गेला. हा पोपट ज्या पक्षाचा हेर आहे तो पक्ष जिंकेल" असे त्रिशीर्ष म्हणाला.


.....जैमिनीय ब्राह्मणातील कथा.