त्रिपोली, लेबेनॉन
त्रिपोली طرابلس | |
लेबेनॉनमधील शहर | |
त्रिपोली | |
देश | लेबेनॉन |
क्षेत्रफळ | १४ चौ. किमी (५.४ चौ. मैल) |
लोकसंख्या (२०१२) | |
- शहर | १,९२,५७२ |
- महानगर | ५.३ लाख |
प्रमाणवेळ | यूटीसी+०२:०० |
http://tripoli-city.org/ |
त्रिपोली (अरबी: طرابلس ; तुर्की: Trablusşam; हिब्रू: Τρίπολις) हे पश्चिम आशियाच्या लेबेनॉन देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. त्रिपोली शहर लेबेनॉनच्या उत्तर भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते बैरूतच्या ८५ किलोमीटर (५३ मैल) उत्तरेस स्थित आहे.
त्रिपोलीचा इतिहास इ.स.पूर्व १४व्या शतकापासूनचा आहे. ते फीनिशिया स्ंस्कृतीमधील एक महत्त्वाचे स्थान होते. त्रिपोलीमधील मुस्लिम वास्तूरचना जगप्रसिद्ध आहे. विसाव्या शतकामधील लेबेनॉनच्या निर्मितीनंतर त्रिपोलीचे महत्त्व झपाट्याने कमी झाले. त्रिपोलीजवळची भूमध्य समुद्रातील चार छोटी बेटे तेथील वैविध्यपूर्ण जैविक रचनेसाठी युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहेत.
जुळी शहरे
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील त्रिपोली पर्यटन गाईड (इंग्रजी)