त्रिनिदाद आणि टोबॅगो
त्रिनिदाद आणि टोबॅगो Republic of Trinidad and Tobago त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: "Together we aspire, together we achieve" (आपण एकत्रितपणे विचार करू, आपण एकत्रितपणे मिळवू) | |||||
राष्ट्रगीत: Forged from the Love of Liberty | |||||
त्रिनिदाद आणि टोबॅगोचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | पोर्ट ऑफ स्पेन | ||||
सर्वात मोठे शहर | चाग्वानास | ||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||
सरकार | संसदीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | ॲन्थनी कार्मोना | ||||
- पंतप्रधान | कमला प्रसाद-बिसेसर | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | ३१ ऑगस्ट १९६२ | ||||
- प्रजासत्ताक दिन | १ ऑगस्ट १९७६ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ५,१३१ किमी२ (१७१वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | नगण्य | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | १३,४६,३५० (१५२वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}} {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | २५४/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | २८.४१४ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | २१,२८७ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.७६० (उच्च) (६७ वा) (२०१२) | ||||
राष्ट्रीय चलन | त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी - ४:०० | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | TT | ||||
आंतरजाल प्रत्यय | .tt | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ८६८ | ||||
त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रजासत्ताक हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स भागातील एक देश आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाच्या ईशान्येस दक्षिण कॅरिबियन समुद्रात त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन बेटांवर वसला आहे.
इ.स. १४९८ साली क्रिस्तोफर कोलंबस येथे पोचल्यापासून १७९७ सालापर्यंत त्रिनिदाद बेट स्पेनची वसाहत होती. १९व्या शतकामध्ये त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन्ही बेटांची मालकी ब्रिटिश साम्राज्याकडे आली. ब्रिटनपासून १९६२ साली स्वतंत्र्य मिळाल्यानंतर १९७६ साली त्रिनिदाद व टोबॅगो प्रजासत्ताक अस्तित्वात आले. सध्या राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असलेल्या ह्या देशामध्ये पेट्रोलियम व रासायनिक हे प्रमुख उद्योग आहेत. कॅरिबियनमधील एक श्रीमंत व समृद्ध देश मानला जाणाऱ्या त्रिनिदाद व टोबॅगोमधील वार्षिक दरडोई उत्पन्न कॅरिबियन परिसरामध्ये सर्वाधिक आहे.
खेळ
- वेस्ट इंडीज क्रिकेट संघ
- त्रिनिदाद आणि टोबॅगो फुटबॉल संघ
- ऑलिंपिक खेळात त्रिनिदाद आणि टोबॅगो
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)