Jump to content

त्रिंबक तेहरानवाला

त्रिंबक गोविंद कारखानीस उर्फ त्रिंबक तेहरानवाला (४ मे, इ.स. १९३९) हे मराठी भाषेतील एक लेखक आहेत.पेशाने अभियंता असलेल्या तेहरानवाला यांनी भारतात आणि इराणमध्ये अनेक वर्षे नोकरी केली.त्यानंतर त्यांनी मराठी भाषेत लेखन सुरू केले.ते १९६८ ते १९७८ या दहा वर्षांच्या काळात तेहरानमध्ये वास्तव्याला होते म्हणून त्यांनी तेहरानवाला हे आपले टोपणनाव घेतले.१९७८ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी मराठी भाषेत अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी गल्ली ते दिल्ली, केरळी रांगोळी, तळेगाव ते तेहरान, गोंधळ आणि जागर आणि कालभारत या कादंबऱ्या तर हायकू कायकू आणि इतर हा कवितासंग्रह लिहिला.