Jump to content

त्रिंगलवाडी किल्ला


त्रिंगलवाडी
नावत्रिंगलवाडी
उंची3238 फूट.
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाण{{{ठिकाण}}}
जवळचे गावघोटी
डोंगररांग
सध्याची अवस्था
स्थापना{{{स्थापना}}}


त्रिंगलवाडी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

या किल्ल्याच्या पायथ्याशी, वाकी नदीच्या उगमस्थानावर झंझराजाने बांधलेले शंकराचे देऊळ आहे.

भौगोलिक स्थान

या किल्यावर नाशिक जिल्ह्यांतील इगतपुरी तालुक्यातील घोटी या गावापासून जाता येते.

इगतपुरीपासुन हा किल्ला सात कि.मी. अंतरावर आहे. ईगतपुरी हे NH 3 वर असलेले गाव आहे आणि ते मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांमध्ये एक आहे

इतिहास

त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जैन लेण्यावरून या किल्ल्याची निर्मिती साधारण १० व्या शतकात झाली असावी. हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला हे ज्ञात नाही. मात्र १६८८ च्या शेवटी मुघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला.

छायाचित्रे

=गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

त्रिंगलवाडी गावातून गडावर जाताना पायथ्याशी पांडवलेणी नावाची गुहा आहे. या लेणी ३ भागात आहेत. ओसरी, आत विहार आणि विहारात कोरलेले कोनाडे, प्रवेशद्वारावर सुंदर कोरीव काम आढळते. विहाराच्या आत असलेल्या कोनाड्यात गौतमबुद्धाची ध्यानस्थ मुर्ती आहे. त्या मूर्तीच्या खाली एक शिलालेख आहे. विहाराच्या ४ खांबापैकी ३ खांबाची पडझड झाली आहे. येथून वर किल्ल्यावर जात असताना वाटेतच पायऱ्यांच्या आधी गुहा लागते.

पायऱ्यांनी गडावर पोहचल्यावर समोरच पडक्या वाड्याचे अवशेष लागतात. वाड्यांचे अवशेष पाहून परत पायऱ्याकडे वळायचे. पायऱ्यांपासून उजवीकडे वळल्यावर अनेक सुकलेली पाण्याची टाकी आढळतात. . ५-१० मिनिटे पुढे गेल्यावर डावीकडे असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी एक मोठी गुहा आहे. या गुहेत २०-२५ जणांना राहता येते. येथून पुढे चालत गेल्यावर पिण्याच्या पाण्याचे भुयारी टाके लागते. टाक्याच्या खांबांवर सुंदर नक्षीकाम आढळते. या टाक्यांपासून पुढे गेल्यावर शंकराचे मंदिर लागते. या मंदिरासमोर कड्यावरून दक्षिणेस तळेगड,

• पूर्वेला कळसूबाई, उत्तरेला त्र्यंबकरांग, हरिहर,

असा परिसर दिसतो. आल्या मार्गाने पायऱ्यांपाशी यावे. पायऱ्यांच्या समोरच वाड्याचे अवशेष आहे. ते मागे टाकून सरळ पुढे वाटेने खाली उतरावे आणि उजवीकडे वळावे. ही वाट गडाच्या गुप्त दरवाजापाशी घेऊन जाते. पायऱ्यांनी खाली उतरल्यावर आपण अखंड कातळात कोरलेल्या दरवाजापाशी पोहचतो. दरवाजाच्या उजवीकडे ६-७ फूट उंच हनुमानाची मूर्ती कोरली आहे. समोरच कातळात कोरलेल्या पायऱ्या किल्ल्याच्या मधल्या पठारावर घेऊन फिरण्यास साधारण १ तास पुरतो.

गडावरील राहायची सोय

गडावरील खाण्याची सोय

गडावरील पाण्याची सोय

=गडावर जाण्याच्या वाटा

चिंचोली मार्गे : या मार्गाने गडावर जाण्यासाठी कसारा

गाठावे. कसाऱ्यावरून जव्हार, मोखाडा किंवा खोडाळा यापैकी जाणारी कुठलीही बस पकडावी आणि 'विहीगाव' फाट्यावर उतरावे. या फाट्याच्या समोरच एक देऊळ आहे. या देवळाच्या मागे म्हणजेच रस्त्याच्या उजवीकडे जाणारी वाट पकडावी. पाऊण तासानंतर चिंचोली नावाचे गाव लागते. या गावाच्यामागून जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने किल्ल्याच्या मध्यभागी असणाऱ्या पठारावर पोहचावे. येथून क्र. २ मध्ये सांगितल्याप्रमाणे २ वाटा जंगलावर जातात. कोणत्याही वाटेने दगडावर पोहचावे. ही वाट फारच लांबची असल्याने याने गड गाठण्यास ४ तास लागतात. वाट चुकण्याचा देखील संभव आहे.

विपश्यना विद्यापीठामार्गे : इगतपुरी स्थानकावरून

15 उत्तर दिशेला म्हणजेच 'विपश्यना विद्यापीठा'कडे उतरावे. विद्यापीठाचे प्रवेशद्वार आल्यावर तेथून समोर असणारी डोंगराची सोंड चढावी. ती वाट आपल्याला प्रचंड कड्याखाली आणून सोडते. तो प्रचंड कडा उजवीकडे ठेवत दोन तासात किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचतो. येथून वर चढण्यास आपल्याला अर्धा तास पुरतो. हा मार्ग पुढे दोन मार्गामध्ये विभागलेला आहे. पूर्वेकडून वर चढणारा मार्ग हा सांगितलेल्या क्र.१ च्या वाटेला जाऊन मिळतो, तर पश्चिमेकडे जाणारी वाट किल्ल्याला उजवीकडे ठेवत एका घळीपाशी पोहचते. या घळीतून वर चढल्यावर पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांनी वर चढल्यावर किल्ल्याचा दरवाजा लागतो.

किल्ल्यावर १५ जणांना राहता येईल एवढी मोठी गुहा आहे. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. गडावर जाण्यासाठी १ तास त्रिंगलवाडी गावापासून, ३ तास चिंचोली गावापासून व २ तास विपश्यना मार्गे लागतात.

मार्ग

जाण्यासाठी लागणारा वेळ

40 मिनिटं

संदर्भ

सांगाती सह्याद्रीचा

डोंगरयात्रा - आनंद पाळंदे

हे सुद्धा पहा

  • भारतातील किल्ले