Jump to content

त्रिंकोमाली वूड

The ornamental trees of Hawaii (1917) (14765975735)
Berrya cordifolia Govindoo

त्रिंकोमाली वूड हे मलाया द्वीपसमूहातील जंगलात आढळणारा वृक्ष आहे.

अंदमान व श्रीलंका हे या वृक्षांचे मूळ प्रदेश आहे.[] सापडते. या झाडाची उंची साधारण २५-४० फुट असून त्याची पणे साधारण पिंपळाच्या पानाच्या आकारासारखी व तितकीच मोठी असतात. या वृक्षाला मे ते ऑगस्ट महिन्यांदरम्यान फुले येतात. फुले सुरुवातीला गुलाबी-पांढरी किंवा पांढरी असतात. फुलांच्या मोसमात झाड पर्णरहित असते. फळाला पाच-सहा कडा असतात व त्यामुळे वाऱ्याच्या मदतीने याचे बीज-प्रसारण होते.

या झाडापासून मिळणारे लाकूड अत्यंत कठीण व टणक असते. वेगवेगळ्या फ्रेम्स, चाकू, अवजारांच्या मुठी, काठ्या, नांगर, बोटी वगैरे साहित्य बनवण्यासाठी याच्या लाकडाचा उपयोग होतो. आंध्र प्रदेशामध्ये तसेच तामिळनाडूमध्ये होड्या बनविण्यासाठी याचा उपयोग करतात.

याच्या बियांवर असलेले केस हे मानवी त्वचेच्या संपर्कात आल्यास खाजकुयलीसारख्या वेदना देतात.

संदर्भ

  • वृक्षराजी मुंबईची - डॉ.मुग्धा कर्णिक
  1. ^ वेल्थ ऑफ इंडिया पुस्तक