Jump to content

त्रयोदशी

त्रयोदशी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात शुक्ल आणि दुसऱ्या पंधरवड्यात वद्य त्रयोदशी येते. प्रत्येक त्रयोदशीला शिवरात्री हे पर्व असते. माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्र म्हणतात. त्रयोदशीला केलेल्या उपासाला प्रदोष हे नाव आहे.. दोन्ही पक्षांत येत असल्याने या दिवसाला पक्षप्रदोष म्हणतात. त्यांना वारानुसार सोमप्रदोष, भौमप्रदोष किंवा शनिप्रदोष ही नावे आहेत.

काही विशेष त्रयोदश्या

  • चैत्र शुद्ध त्रयोदशी - अनंग त्रयोदशी; महावीर जयंती
  • ज्येष्ठ वद्य त्रयोदशी - अंगीरस ऋषी जयंती
  • आषाढ शुक्ल त्रयोदशी - मंगल तेरस
  • आश्विन वद्य त्रयोदशी - धनत्रयोदशी; धन्वंतरी जयंती
  • माघ शुद्ध त्रयोदशी - विश्वकर्मा जयंती
  • माघ वद्य त्रयोदशी - महाशिवरात्र
  • पौष वद्य त्रयोदशी - मेरु त्रयोदशी (जैन)
  • फाल्गुन कृष्ण त्रयाॊदशी -मधुकृष्ण त्रयोदशी