तोडा फोडा आणि झोडा नीती (राजकारण)
राजकारणात टिकून रहाण्यासाठी बऱ्याचदा तोडा, फोडा आणि झोडा या नीतीचा अवलंब केला जातो. हिंदुस्थानात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या नीतीचा उपयोग केला असे मानले जाते. ब्रिटिश लोक हिंदुस्थान सोडून गेल्याच्या नंतरच्या काळात भारतीय राजकारणी या तंत्रात अधिकच वाकबगार झाल्याचे मानले जाते. (क्षितिजसरांच्या सल्ल्यास अनुसरून या वाक्यासही संदर्भ देईन अथवा आवश्यक फेरफार करेन . तसे संदर्भ उपलब्ध होणे अवघड असणार नाही हे वेगळे सांगण्याची आवश्यकता असेल असे वाटत नाही. क्षितिजसर तुमच्या सल्ल्यास अनुसरून माझी मते वगळून खालील एक परिच्छेद बदलला त्याबद्दल तुमचे मत कळवा . गरजेनुसार अजून संदर्भ आणि बदल उपलब्ध करता येतील.)
बदलत्या राजकीय समीकरणातही टिकाऊ नातेशाही
- मुख्यलेख "लोकशाही राजकारणातील घराणेशाही" वाचा
Sep 24, 2009, 11.35PM IST महाराष्ट्र टाइम्स मधील "सोयरे सकळ " लेखात पत्रकार प्रकाश आसबे म्हणतात, "महाराष्ट्रातील ...... पुढारी केवळ सत्तेचे वाटेकरी नसून परस्परांशी बेटीव्यवहार करून त्यांनी आपली सत्ताधाऱ्यांची 'जमात'च बनवली आहे. परिणामी सत्ता कोणाकडेही गेली तरी ती सत्ताधारी जमातीतच राहते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची सत्तेची सोयरीक पिढ्यान्पिढ्या अबाधित राहते. निवडणुकीच्या राजकारणात उमेदवारही त्यांचे आणि बंडखोरही त्यांचेच असतात. अधिकृत उमेदवार निवडून आला तर तो त्यांचाच असतो आणि बंडखोर निवडून आला तरी तो त्यांचाच सोयरा असल्याने सत्तेच्या समीकरणात आपोआपच सामील होतो......". "सोयरे सकळ " लेखात बरीच उदाहरणे देऊन पत्रकार प्रकाश आसबे पुढे म्हणतात, ".... कोणाकडेही सत्ता गेली तरी ती सत्ताधारी जमातीतच राहते. सत्ताधारी आणि बंडखोर हे दोघेही सत्ताधारी जमातीचेच असतात. त्यामुळे सत्तेचा सूर्य सत्ताधारी जमातीतून कधीच मावळत नाही, असे म्हणतात, तेच खरे! "[१]
मुद्दे
धर्मा शिवाय अनेक मुद्दे सत्ताधारी किंवा राजकारणी वापरतात.[ संदर्भ हवा ]
क्र. | मुद्दा | वापर (भारतीय) | वापर (आंतरराष्टीय) |
---|---|---|---|
१ | धर्मा वरील भेदभाव |
|
|
२ | जाती वरील भेदभाव |
| |
३ | प्रादेशिक वाद |
| |
४ | वंशवाद (रेसिस्ट) |
|
|
५ | कम्यूनिस्ट फोबिया |
|
|
बऱ्याच वेळा राजकारणी एका पेक्षा अनेक तोडा फोडा मुद्य्यांचा वापर करतात.
संदर्भ
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-5052932,prtpage-1.cms[permanent dead link]