तैलरंग
तैलरंग (इंग्लिश: Oil paint, ऑइल पेंट ;) हे वाळणाऱ्या तेलांमध्ये रंगद्रव्ये कालवून बनवलेले व धिम्या गतीने वाळणारे रंगमाध्यम असते. सहसा तैलरंगांमधील तेलासाठी जवसाचे तेल वापरले जाते. तैलरंगांचा दाटपणा कमी करण्यासाठी त्यांत टर्पेंटाइन किंवा पांढरे स्पिरिट मिसळतात; तर तैलरंगांच्या वाळलेल्या थराची चमक खुलवायला व्हार्निशाचा वापर करतात. इ.स.च्या पंधराव्या शतकापासून तैलरंगचित्रण पद्धत लोकप्रिय ठरल्यापासून हे माध्यम आजवर चित्रकलेतील प्रमुख रंगमाध्यमांपैकी एक मानले जाते.
बाह्य दुवे
- तैलरंगांचा इतिहास (इंग्लिश मजकूर)