Jump to content

तेली


तेली ही महाराष्ट्रभारतासह दक्षिण आशियात अन्यत्र आढळणारी एक जात आहे. पूर्वीच्या काळी तेलाचे गाळप व विक्री करण्याच्या पेशातील लोकांना 'तेली' या संज्ञेने उल्लेखले जाई. तेली जातीत हिंदू, तसेच इस्लाम या धर्मांचे प्रचलन आढळते. सहसा इस्लामधर्मीय तेली समाजाचा उल्लेख तेली या संज्ञेपेक्षा रोशनदार या संज्ञेने केला जातो. वर्तमान काळात भारतीय प्रजासत्ताकात ही जात इतर मागासवर्गीय जातींत गणली जाते.

प्रसिद्ध व्यक्ती

  • संताजी जगनाडे (अंदाजे इ.स्. १६२४ - इ.स. १६८८) : मराठी संत तुकारामांनी रचलेल्या तुकाराम गाथा या अभंगांच्या संग्रहाचे लेखन यांनी केले. महाराष्ट्रातील देहू गावाजवळच्या सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते.
  • मेघनाद साहा (इ.स. १८९३ - इ.स. १९५६) : भारतीय खगोलशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ.
  • नरेंद्र मोदी : गुजराती, भारतीय राजकारणी.
  • वेंकटेश प्रसाद : कन्नड, भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेला क्रिकेट खेळाडू.
  • कृष्णा गोमाशे : नगरसेवक, अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती, महाराष्ट्र, राजकारणी.
  • नारायण तोताराम तेली (पांडव) (इ.स.१८९०ते इ.स.१९७९) स्वातंत्र्य सेनानी, जनसंघ प्रचारक, १९४७ पूर्वीच्या स्वातंत्र्य लढ्यात दोन वेळा त्यांना तुरुंगवास. टाकळी वतपाळ, नांदुरा, जि.बुलढाणा.