तेलंगणासाठीची चळवळ
तेलंगणासाठीची चळवळ (तेलंगणा चळवळ) ही आंध्र प्रदेश राज्यातील तेलंगणा या प्रादेशिक भागात १९४८-१९५१ या कालखंडात सूरू होती. ही चळवळ हैद्राबादचा नवाब निजाम आणि जमीनदार यांच्या विरोधात झाली होती. कम्युनिस्ट पक्षाने अल्पभूधारक आणि शेतमजूर, वेठबिगार यांच्यावर होणाऱ्या अन्याय विरोधात आवाज उठविला होता. कम्युनिस्ट पक्षात स्त्रिया व पुरुष सहभागी होत्या. या चळवळीमध्ये स्त्रियाचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता परंतु त्यांना चळवळीमधील जबाबदारीची कामे न देता चळवळीतील दुय्यम प्रकारची कामे सोपवण्यात येत होती.[१]
तेलंगणा चळवळ पार्श्वभूमी
स्वातंत्र्यपूर्व काळात संस्थाने आणि ब्रिटिश राजवट वेगवेगळे होते. हैद्राबाद हे एक सर्वात मोठे राजघराणे केंद्रित राज्य होते व ते निजाम असफ जहा नवाब उस्म्मान अली खान बहादूर याच्या राजवटी खाली होते. यामध्ये हिंदू प्रादेक्षिक भाग खूप मोठा असला तरी ही मुस्लिम राजवट होती. हा बहु हिंदू प्रादेक्षिक भाग मराठवाडा, कर्नाटक, तेलुगू अशा तीन विभागात विभागला गेला होता. त्यामध्ये मराठी कनाडा आणि तेलुगू बहुभाषिक होते व उर्दू अल्प भाषिक होते तरी देखील उर्दू ही राष्ट्र भाषा म्हणून वापरणे अनिवार्य होते. तेलंगणा चळवळ ही निजामाच्या हुकुमशाही विरोधात व सरंजामशाही जमीनदार यांच्या शोषणाविरोधात उभी राहिली होती.
हैद्राबाद मधील ३००० गावातील ३ दशलक्ष भूमीहीन लोक व वेठबिगार त्यांच्या जमिनीच्या व मजुरीच्या संदर्भात चळवळीत सामील झाले होते. त्याचबरोबर हैद्राबाद शहरातील नागरिक त्यांच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्यासाठी चळवळ मध्ये सहभागी झाले होते.[२]
तेलंगणा चळवळीमध्ये महिलांची भूमिका व स्थान
तेलंगणात निंजामाच्या कालखंडात स्त्रिया वंश परंपरेने जमीनदारकडे गुलाम होत्या. त्याकाळात स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते. स्त्रियांना समाजात सुरक्षितता व आदर नव्हता. कुटुंबातील कोणीही बोलले तरी त्याचे परिणाम हे कुटुंबातील बाईलाच भोगावे लागत. स्त्रीला जमीनदार हे त्यांची मालमत्ता समजत होते.
तेलंगणात निंजामाच्या कालखंडात स्त्रिया शिक्षणापासून वंचित होत्या. जमीनदारांच्या घरात गुलाम म्हणून घरातील सर्व कामे करणे, तसेच स्वतच्या घरातील घरकाम आणि मुलांची काळजी घेणे एवढी त्यांची जबाबदारी होती . भोगवादीवस्तू म्हणून त्यांचा वापर जमीनदार करत होते. त्यांचे तारुण्य उपभोगुन झाल्यावर त्यांना सोडून दिले जात. त्यातून होणारी संतती व स्वतःचा उदरनिर्वाहासाठी तिलाच स्वतः संघर्ष करावा लागे. या महिला जमीनदार उपभोगत पण त्यांच्याशी विवाह केला जात नसे. विवाहासाठी गुलामीत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी त्यांचा विवाह होत. या काळात गुलाम पुरुषांची स्थिती ही वाईटच होती त्यांना त्यांच्या मालकिणी ह्या मारहाण करत असे. गुलाम म्हणून एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबात हस्तांतरित केले जात. या सर्व अन्यायामुळे या चळवळीत पुरुष बरोबर महिला देखील सहभागी झाल्या. परंतु त्यांना चळवळी मधील जबाबदारीची कामे न देता चळवळीतील दुय्यम प्रकारची कामे सोपवण्यात येत होती.[३]
संदर्भ
- ^ Recasting women : essays in colonial history. Sangari, Kumkum., Vaid, Sudesh, 1940- (2006 ed ed.). New Delhi: Kali for Women (Zubaan). 2006. pp. 181–203. ISBN 8186706038. OCLC 151175050.CS1 maint: others (link) CS1 maint: extra text (link)
- ^ We were making history : life stories of women in the Telangana people's struggle. Lalita, Ke., Kannabiran, Vasantha., Melkote, Rama S., Maheshwari, Uma., Tharu, Susie J., Shatrugna, Veena. London: Zed Books. 1989. pp. 1–10. ISBN 0862326788. OCLC 298105153.CS1 maint: others (link)
- ^ Stree Shakti Sanghatna, S (1989). We were making history : life stories of women in the Telangana people's struggle. Lalita, Ke., Kannabiran, Vasantha., Melkote, Rama S., Maheshwari, Uma., Tharu, Susie J., Shatrugna, Veena. London: Zed Books. pp. 45–54. ISBN 0862326788. OCLC 298105153.