Jump to content

तेरेक तुतवार

तेरेक तुतवार

तेरेक तुतवार किंवा तेरेक टीबळा (इंग्लिश:terek sandpiper, avocet-sandpiper; हिंदी:चुपका) हा एक पक्षी आहे.

आकाराने लाव्यापेक्षा मोठा. लांब काळी चोच. चोचीचा बाक वरच्या बाजूला. चोचीचे मुळ पिवळे. आखूड नारंगी-पिवळ्या रंगाचे पाय. पंखाची किनारपट्टी शुभ्र. वरील भागाचा वर्ण राखट. खांद्यावर काळा डाग पांढुरक्या भुवया. शेपटीचा भाग किंचित पिवळसर. खालचा भाग पांढरा. मान व राखी झाक असलेल्या छातीवर अस्पष्ट रेघोट्या.

वितरण

भारत, श्रीलंका, अंदमान व निकोबार बेटांत हिवाळी पाहुणे. पूर्वे फिनलॅंड ते बायकेल सरोवर या भागांत विलीन असतात.

निवासस्थाने

चिखलाणी भागात निवासी असतात.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली