Jump to content

तेरा ताली नृत्य

प्रस्तावना :

[]तेरा ताली नृत्य हे राजस्थान राज्यातील एक अत्यंत प्रसिद्ध नृत्य आहे. रामाची भक्ती करण्यासाठी हे नृत्य करण्याचा प्रघात आहे. राजस्थानातील कामार या जमातीद्वारे हे नृत्य केले जात असे आता मात्र हे नृत्य संपूर्ण राजस्थानात तसेच भारतातही प्रसिद्ध आहे. शरीराच्या विविध अवयवांना तेरा मंजिऱ्या अर्थातच टाळ बांधण्याच्या पद्धतीमुळे या नृत्याला तेरा ताली असे नाव प्राप्त झाले.


नृत्य पद्धती :

हे नृत्य मुख्यत्वे स्त्रियांकडून केले जाते. तर पुरुष या नृत्यासाठी भजने म्हणतात. राजस्थानातील हे एकमेव बसून केले जाणारे लोकनृत्य आहे. या नृत्यामध्ये एकूण तेरा मंजिऱ्या पाय, हात, मनगटे, दंड, कंबर इत्यादी ठिकाणी बांधल्या जातात. भजनाच्या तालावर या मंजिऱ्यावर हातातील टाळांच्या सहाय्याने आघात करत हे नृत्य केले जाते. या नृत्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या नृत्यादरम्यान सादर होणाऱ्या तेरा वेगवेगळ्या प्रकारच्या कला होय. तोंडाने तलवार उचलणे, एकावर एक ठेवलेली मडकी उचलणे इत्यादी गोष्टी पाहून प्रेक्षक अचंबित होतात. या सर्व गोष्टींमुळे तेरा ताली नृत्य हे करण्यास अत्यंत आव्हानात्मक असे नृत्य समजले जाते.


वेशभूषा :

  तेरा ताली नृत्याचे वैशिष्ट्य म्हणजे शरीरावर बांधलेल्या मंजिऱ्या. या मंजिऱ्या तांबे, पितळ, जस्त किंवा कांस्य धातूपासून बनलेल्या असतात. सामान्यपणे घागरा, चोळी आणि ओढणी हा या नृत्याचा पोशाख असतो.


वाद्ये :

पखवाज, ढोलक, सारंगी, बाजाची पेटी अशी अनेक वाद्ये या नृत्याला साथ देत असतात.


संदर्भ

  1. ^ "तेरा ताली नृत्य".