तेरडा
तेरडा | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
तेरडा | ||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||
|
तेरडा (गौर, गौरीची फुले, गुलमेंदी, गौरीहू, तेर, तेरणा)
तेराडा, ज्याला लॅटिनमध्ये गार्डन बालसम, टच मी नॉट म्हणूनही ओळखले जाते, ही पूर्व तसेच दक्षिण आशियामध्ये आढळणारी वर्षायू वनस्पती आहे. हिच्या फांद्या जाड परंतु ठिसूळ असून या वनस्पतीची उंची २० ते ७५ सेमी उंचीपर्यंत असते. पानांची मांडणी सर्पिलाकारात असते . पाने २.५ ते ५ सेंमी लांब आणि १ ते २.५ सेमी रुंद असून पानांच्या कडा तलवारीच्या पात्यासारख्या व किंचित दातेरी असतात. फुलांचा रंग पांढरा, गुलाबी, लाल किंवा जांभळा दिसून येतो. फुलं अतिशय नाजूक असून पावसाळ्यात उगवतात. फुलांचं आयुष्य फक्त पाच दिवस असते.