तेजस्विनी अनंत कुमार
तेजस्विनी अनंत कुमार (जन्म ११ मार्च १९६६) एक भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. या अदम्य चेतना फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत, बेंगळुरू स्थित या स्वयंसेवी संस्थेचे मुख्य उद्दिष्ट अधिकारवंचित मुलांना अन्न-अक्षर-आरोग्य मिळवून देणे असा आहे. तेजस्विनी या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या असाून भाजपा कर्नाटक उपाध्यक्ष आहेत.[१]
पूर्व जीवन
तेजस्विनी या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध विद्यार्थी उपक्रमांमध्ये सक्रिय होत्या. त्यांनी अभविपच्या राज्य सहसचिव आणि राष्ट्रीय कार्यकारी सदस्य म्हणून काम केले. १९८८ आणि १९९३ दरम्यान, त्यांनी बेंगळुरूमध्ये सॉफ्टवेर इंजिनिअर, बीएमएस कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये व्याख्याता आणि एसडीएम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये व्याख्याता म्हणून काम केले.[२]
समाजकार्य
तेजस्विनी यांनी आपले पती अनंत कुमार यांच्यासह १९९८ मध्ये अनंत कुमारची आई गिरिजा शास्त्री यांच्या स्मरणार्थ अदम्य चेतना फाउंडेशन ही समाजसेवेसाठी एक ना-नफा संस्था स्थापन केली. हे वंचित मुलांना शाळांमध्ये दुपारचे अन्न पुरवते. दररोज सुमारे २,००,००० विद्यार्थ्यांनी याचा लाभ मिळतो.
२००६ पासून तेजस्विनी श्री शंकर कॅन्सर फाउंडेशनच्या संस्थापक विश्वस्त आहेत, या संस्थेद्वारे ना-नफा तत्त्वाने २५० खाटा असलेला अत्याधुनिक धर्मादाय दवाखाना, कर्करोगाचा उपचार आणि प्रतिबंध हे मुख्य उद्दिष्ट असलेल्या सुविधा पुरविल्या जातात.
संदर्भ
- ^ "Tejaswini Ananth Kumar appointed Karnataka BJP VP after being denied LS ticket from B'luru South".
- ^ Jan 2, Deepika Burli / TNN /; 2017; Ist, 07:03. "`Our Annapoorna kitchens are paathshaalas, prayogashaalas too' | Bengaluru News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-09-13 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)