Jump to content

तेजश्री प्रधान

तेजश्री प्रधान
जन्म २ जून, १९८८ (1988-06-02) (वय: ३६)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख चित्रपटती सध्या काय करते
प्रमुख टीव्ही कार्यक्रमहोणार सून मी ह्या घरची, अग्गंबाई सासूबाई
पती
शशांक केतकर
(ल. २०१४; घ. २०१५)
स्वाक्षरी

तेजश्री प्रधान (२ जून १९८८) ही एक सुंदर अभिनेत्री आहे. तेजश्री प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये आणि मराठी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते. ती मूळची डोंबिवलीची असून तिने 'ह्या गोजिरवाण्या घरात' या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिची नंतरची मुख्य भूमिका 'लेक लाडकी ह्या घरची' मालिकेमध्ये होती. तसेच झी मराठी वरील 'होणार सून मी ह्या घरची' या सुपरहिट झालेल्या मालिकेमध्ये केलेल्या जान्हवीच्या भूमिकेमुळे तेजश्रीला अमाप लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील नायक श्रीरंगची भूमिका करत असलेला शशांक केतकर याच्याशी तिने लग्न केले, पण वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर तिची झी मराठी वरील 'अग्गंबाई सासूबाई' ही मालिकाही लोकप्रिय ठरली.

मालिका

नाटके

  • कार्टी काळजात घुसली
  • मैं और तुम

चित्रपट

पुरस्कार

वर्ष पुरस्कार श्रेणी भूमिका मालिका
२०१३ झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारसर्वोत्कृष्ट नायिकाजान्हवी गोखले होणार सून मी ह्या घरची
सर्वोत्कृष्ट जोडी (शशांक केतकर सोबत)
२०१४ सर्वोत्कृष्ट नायिका
सर्वोत्कृष्ट जोडी
सर्वोत्कृष्ट सून
मटा सन्मानसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आनंदी लग्न पहावे करून
संस्कृती कलादर्पण पुरस्कार
२०१९ झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१९सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स ऑफ द इयर शुभ्रा कुलकर्णी अग्गंबाई सासूबाई
२०२०-२१ झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२०-२१सर्वोत्कृष्ट सून

बाह्य दुवे