तुर्कस्तानचे प्रदेश
तुर्कस्तान देश ७ भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. हे सात प्रदेश एकूण २१ उप-प्रदेशांमध्ये वाटले गेले आहेत. ह्या प्रदेशांची रचना १९४१ साली करण्यात आली. ह्या प्रदेशांचा वापर प्रशासकीय कारणांसाठी होत नसून केवळ भौगोलिक, लोकसांख्यिक व आर्थिक माहितीसाठी ते वापरले जातात.