Jump to content

तुरेबाज चंडोल

तुरेबाज चंडोल
शास्त्रीय नाव Galerida cristata
कुळ चंडोलाद्य (Alaudidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Crested Lark
संस्कृत शिखावंत चंडोल
Galerida cristata

वर्णन

तुरेबाज चंडोल साधारण १८ सें. मी. आकाराचा पक्षी आहे. नर-मादी दिसायला सारखेच असतात, त्यांच्या पाठीकडून गडद बदामी-मातकट रंग त्यावर तुटक रेषा, पोटाकडून पांढरा रंग आणि पिवळसर रंगाचे पाय. इतर चंडोल प्रमाणेच नर तुरेबाज चंडोल उंच भरारी मारण्यासाठी आणि उडतांना गोड गाणी म्हणण्यासाठी प्रसिद्ध आहे. वीण काळात अनेक नर उंच उंच उडून स्पर्धा करतात.

वास्तव्य/आढळस्थान

खुले मैदानी प्रदेश, अर्ध वाळवंटी प्रदेश, कमी गवताळ भाग अशा प्रकारच्या प्रदेशात राजस्थान ते मध्य प्रदेश महाराष्ट्रसह दक्षिण भारत तसेच पश्चिम बंगाल, ओडिशा या भागात सर्वत्र राहणारा पक्षी तसेच चीन आणि आफ्रिकेतील काही तुरेबाज चंडोल पक्ष्याचे भागात वास्तव्य आहे.

खाद्य

गवताळ भागात, दगड-कपारीत असलेले विविध कीटक हे यांचे खाद्य आहे.

प्रजनन काळ

मार्च ते जून हा काळ तुरेबाज चंडोलचा प्रजनन काळ असून गवतातच साधे घरटे बांधले जाते. मादी एकावेळी ३ ते ४ फिकट पिवळी-पांढरी त्यावर जांभळी किंवा तपकिरी ठिपके असलेली अंडी देऊन एकटीच अंडी उबविते. मात्र पिलांना खाऊ घालण्याच्या कामात नर मादीला मदत करतो.